प्रतीक्षा आता मंत्रिमंडळ विस्ताराची
कोल्हापुरातील मंत्रीपदासाठी इच्छुक असणाऱ्यांच्या नेत्यांच्या निर्णयाकडे नजरा
कोल्हापूर :
महायुती सरकारचा बुधवारी मुंबईत भव्य स्वरूपात शपथविधी सोहाळा झाला. यावेळी मुख्यमंत्री पदी देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे, अजित पवार यांनी शपथ घेतली. त्यांच्यासह 20 ते 30 आमदारही मंत्रीपदाची शपथ घेतील, असा अंदाज होता. परंतू तसे झालेले नाही. यामुळे कोल्हापुरातील मंत्रीपदासाठी वेध असणाऱ्या आमदारांमध्येही उत्स्कुता शिगेला पोहोचली आहे. त्यांना आता मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या प्रतिक्षा करावी लागणार आहे.
विधानसभेच्या निवडणूकीत कोल्हापूर जिल्ह्यातील महायुतीचे सर्वच 10 उमेदवार विजय झाले आहेत. यामध्ये राष्ट्रवादीतून हसन मुश्रीफ, शिवसेनेतून राजेश क्षीरसागर, प्रकाश आबिटकर, चंद्रदिप नरके, भाजपमधून अमल महाडिक, राहूल आवाडे, जनसुराज्यचे विनय कोरे, अशोकराव माने, अपक्ष राजेंद्र पाटील-यड्रावकर, भाजपचे बंडखोर उमेदवार शिवाजीराव पाटील यांचा समावेश आहे. यामध्ये हसन मुश्रीफ, विनय कोरे, आबिटकर, क्षीरसागर यांना मंत्रीपद मिळणार असल्याची जोरदार चर्चा आहे. मुंबईत गुरूवारी शपथविधी सोहळा झाला. यावेळी देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांच्या मंत्रीमंडळात कोणाला संधी मिळणार याकडे सर्वांच्या नजरा लागून आहेत. यामध्ये कोल्हापुरातील इच्छुकांचा समावेश आहे.
पालकमंत्री पदासाठीही होणार रस्सीखेच
पालकमंत्री पदासाठी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेत हसन मुश्रीफ यांच्या नावाची चर्चा होत आहे. परंतू कोल्हापुरात शिवसेनचे तीन आमदार आहेत. त्यांच्यामधूनही पालकमंत्रीपदावर दावा असणार आहे. यामुळे मंत्रिमंडळ विस्तारीनंतर पालकमंत्रीपदीही कोल्हापुरात रस्सीखेच होणार आहे.