भारतातील व्हेनिस केरळमध्ये
इटलीतील व्हेनिस जगातील सर्वात अनोखे आणि रोमँटिक शहर असून ते 118 छोट्या बेटांवर वसलेले आहे. या शहराला 400 हून अधिक पूल आणि 150 हून अधिक कालव्यांनी जोडले गेले आहे. हे शहर स्वत:च्या सौंदर्यासाठी जगभरात प्रसिद्ध आहे. परंतु भारतातही व्हेनिस शहराप्रमाणे एक गाव आहे. हे भारतातील अनोखे गाव केरळमध्ये स्थित असून त्याचे नाव कदमकुडी आहे. हे गाव कोची शहरानजीक असून ते सुमारे 14 छोट्या-छोट्या बेटांचा शांत आणि अद्भूत समूह आहे. कोचीपासून 15 किलोमीटर अंतरावरील हे गाव स्वत:चे शांत बॅकवॉटर, कांदळवनं, हिरवीगार बहरणारी शेती, पारंपरिक मासेमारीच्या संस्कृतीसाठी प्रसिद्ध आहे. हे एक शांत आणि आल्हाददायक पर्यटनस्थळ आहे.
या गावात व्हेनिस शहरासारखेच दृश्य दिसून येते. गावात रस्ते पाण्यात तरंगताना दिसून येतात. पाहण्यास हे अत्यंत सुंदर आणि मनमोहक दृश्य आहे. केरळच्या अलप्पुझा जिल्ह्यात कुट्टनाड क्षेत्रात वसलेले गाव पाण्याच्या मार्गांसाठी पूर्ण जगात प्रसिद्ध आहे. याची जमीन समुद्रसपाटीपासून खाली आढळून येते. यामुळे येथे सर्वत्र हिरवाई आणि पाणी दिसून येते. केरळच्या या अनोख्या गावात सर्वत्र पाणी दिसून येते. येथील रस्ते पाण्यांच्या मधोमध आहेत. येथे लोक एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी नौकेची मदत घेतात. येथे घरांनजीक देखील पाणी वाहत असते.