गाडीला दिले चालत्या-फिरत्या घराचे स्वरुप
बेडरुमपासुन बाथरुम देखील उपलब्ध
संपत्तीच्या किमती सातत्याने वाढत आहे, घरमालक देखील आता अधिक भाडे वसूल करत आहेत. अशा स्थितीत लोकांसाठी घर खरेदी करणे किंवा भाड्याने राहणे अत्यंत अवघड ठरतेय. याचमुळे लोक आता अन्य मार्गांचा शोध घेत आहेत. काही लोक स्वत:च्या वाहनालाच घराचा लुक देत आहेत. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत असून यात एका व्यक्तीने स्वत:च्या वाहनालाच चालते फिरते घर करून सोडले आहे. या घरात प्रत्येक आवश्यक सुविधा उपलब्ध आहे.
हा व्हिडिओ व्हॅन लाइफ बिल्ड्सने शेअर केला आहे. ग्लोरियाला भेटा, आमचे नवे. मजेशीर आधुनिक-रेट्रो कॅम्पर डिझायनर कारयुक्त घराला भेटा, यात पॉपिंग छत आणि वळणदार स्टोरेजयुक्त जिना देखील आहे’ अशी कॅप्शन या व्हिडिओला देण्यात आली आहे. या व्हिडिओत एक कार उभी असल्याचे आणि एक व्यक्ती या कारचा दरवाजा उघडत असल्याचे दिसून येते. कारचा दरवाजा उघडताच एखाद्या बंगल्यात शिरत असल्याचे वाटते. दरवाजानजीक बसण्यासाठी एक खूर्ची असून त्यानंतर बेडरुम दिसते. तसेच नजीकचे किचनही नजरेस पडते.
या कारमध्ये जिनाही तयार करण्यात आला असूत तो छतापर्यंत जातो. सर्वसाधारणपणे इतक्या छोठ्या कारमध्ये छतावर काहीच नसते, परंतु या व्हॅन हाउसमध्ये छतावर झोपण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. जिन्यामध्येच अन्य सामग्री ठेवण्यासाठी जागा निर्माण करण्यात आली आहे. बसण्याच्या जागेसोबत व्हॅन हाउसमध्ये बेडरुम आणि बाथरुम देखील आहे. इन्स्टाग्रामवर या घराचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओला आतापर्यंत 1 कोटी 28 लाखाहून अधिक वेळा पाहिले गेले आहे. लाखो लोकांनी या व्हिडिओला लाइक अणि शेअर केले आहे.