For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

वाहन घरीच, टोलनाक्यावर रक्कम मात्र कपात

10:55 AM May 07, 2024 IST | Tarun Bharat Portal
वाहन घरीच  टोलनाक्यावर रक्कम मात्र कपात
Advertisement

खानापूर रोड गणेबैल टोलनाक्यावरील प्रकार;  वाहनधारकाला फटका

Advertisement

बेळगाव : टोलनाक्यावरून वाहन न जाताही वाहनधारकाच्या बँक खात्यातून रक्कम गायब झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. वाहन घरामध्ये थांबलेले असतानाही खानापूर रोडवरील गणेबैल टोलनाक्यावरून वाहन गेल्याचे दाखवून बँकमधून रक्कम कपात करण्यात आली आहे. यामुळे वाहनधारकाला धक्का बसला आहे. याबाबत टोलनाका हेल्पलाईनकडे मदत मागितल्यास उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत. गणेशपूर येथील रहिवासी रजनीकांत यादवाडे यांच्या बाबतीत हा प्रकार घडला आहे. रजनीकांत हे खानापूर रोडवरील टोलनाक्यातून वाहन घेऊन गेलेच नाहीत. सोमवारी ते घरीच होते. असे असतानाही दि. 6 रोजी 11.54 वाजता गणेबैल टोलनाक्यातून केए 22 एमबी 7488 क्रमांकाचे वाहन गेल्याचे दाखवून 30 रुपये बँक खात्यावरून कपात करण्यात आले आहेत. टोलची रक्कम कपात झाल्याचा मेसेज आल्यानंतर त्यांना ही बाब लक्षात आली. याबाबत त्यांनी टोलनाक्याच्या हेल्पलाईन क्रमांकाशी संपर्क साधून विचारपूस केली असता बँकेशी संपर्क साधण्याचे सांगण्यात आले. टोलनाक्यावरून वाहन गेले नसताना रक्कम कपात केल्याबद्दल प्रश्न विचारला असता उडवाउडवीचे उत्तर देण्यात आले. या गलथान कारभाराबाबत ग्राहक न्यायालयामध्ये दाद मागणार असल्याचे त्यांनी सांगितले. ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार वाढीस लागले आहेत. वाहनांना टोलनाक्यावर थांबावे लागू नये, ऑनलाईनच टोल भरला जावा, यासाठी फास्टटॅगची सुविधा करण्यात आली आहे. यामुळे वाहनधारकांना सोयीचे झाले आहे. मात्र अशा धक्कादायक प्रकारामुळे आर्थिक फटका बसत असल्याने वाहनधारकांतून संताप व्यक्त करण्यात येत आहे. अशी फसवणूक होऊ नये यासाठी योग्य ती खबरदारी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.