For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दहशतवाद्यांकडून ‘स्टिकी बॉम्ब’चा वापर

07:00 AM May 20, 2022 IST | Tarun Bharat Portal
दहशतवाद्यांकडून ‘स्टिकी बॉम्ब’चा वापर
Advertisement

काश्मीरमध्ये नवा धोका : एनआयएकडून तपासाला वेग

Advertisement

वृत्तसंस्था / श्रीनगर

काश्मीर खोऱयात काही दिवसांपूर्वी एका बसवर दहशतवादी हल्ला झाला, या हल्ल्यात चार जण मारले गेले तर 24 जण जखमी झाले हेते. या प्रकरणाचा तपास एनआयए करत आहे. या हल्ल्यासाठी दहशतवाद्यांनी ‘स्टिकी बॉम्ब’चा वापर केला असल्याचे तपासात आढळून आल्याचे समजते. हा बॉम्ब अफगाणिस्तानात अमेरिका तसेच नाटो सैन्याकडून मोठय़ा प्रमाणात वापरण्यात आला होता. स्टिकी बॉम्ब एकप्रकारचा एम्प्रोवाइज्ड एक्सप्लोझिव्ह डिव्हाइस म्हणजेच आयईडी आहे.

Advertisement

जर्मनीतील वृत्त संकेतस्थळ ‘डॉयचे वेले’ने हा हल्ला आणि स्टिकी बॉम्बच्या वापराशी निगडित एक वृत्तअहवाल प्रकाशित केला आहे. यानुसार हल्ल्याची जबाबदारी जम्मू-काश्मीर फ्रीडम फायटर्स नावाच्या दहशतवादी संघटनेने स्वीकारली होती. या संघटनेबद्दल अधिक माहिती उपलब्ध नाही. बसवर हल्ला करण्यासाठी स्टिकी बॉम्बचा वापर करण्यात आला होता. हा बॉम्ब कुठल्याही वाहनावर सहजपणे चिकटविला जाऊ शकतो आणि नंतर रिमोटद्वारे त्यात स्फोट घडवून आणता येतो.

दहशतवाद्यांचा दावा खरा मानल्यास काश्मीरसाठी हा नवा परंतु धोकादायक संकेत आहे. फेब्रुवारी 2021 मध्ये सुरक्षा दलांनी अनेक बॉम्ब हस्तगत केले होते. अफगाणिस्तानात नाटो सैन्याकडून अशाप्रकारच्या बॉम्बचा वापर करण्यात येत होता. अमेरिकेत निर्मित असल्याचा शिक्का असणारी अनेक शस्त्रास्त्रs मागील काही काळात हस्तगत करण्यात आल्याची माहिती भारतीय सैन्याधिकाऱयांनी दिली आहे. अफगाणिस्तानातून ही शस्त्रास्त्रs पाकिस्तानमार्गे दहशतवाद्यांच्या हातात पोहोचत आहेत.

नाटोची शस्त्रास्त्र

नाटो सैन्याने अफगाणिस्तानातून परतताना अनेक आधुनिक शस्त्रास्त्रs तेथेच सोडून दिली होती. एम4 कार्बाइन रायफल काश्मीरमध्ये हस्तगत करण्यात आली आहे. तर एम249 ऑटोमॅटिक रायफल, 509 टॅक्टिकल गन, एम1911 पिस्टल्स आणि एम4 कार्बाइन रायफल्सही दहशतवाद्यांकडून हस्तगत करण्यात आल्या आहेत. याचबरोबर इरीडियम सॅटेलाइट फोन आणि थर्मल इमेजरी डिव्हाइसही दहशतवाद्यांकडे असल्याचा संशय आहे. या शस्त्रास्त्रांद्वारे दहशतवादी हल्ला घडवून आणू शकतात.

भारतीय सैन्याची तयारी

अमेरिकेत निर्मित काही शस्त्रास्त्रs दहशतवाद्यांपर्यंत पोहोचली आहेत. ही शस्त्रास्त्रs अफगाणिस्तानमार्गे काश्मीरमध्ये पोहोचली आहेत. नियंत्रण रेषेवर काही चकमकींदरम्यान ही शस्त्रास्त्रs हस्तगत करण्यात आल्याची माहिती मेजर जनरल अजय चांदपुरिया यांनी दिली होती. अफगाणिस्तानात तालिबानची राजवट आल्याने याचा प्रभाव विशेषकरून काश्मीरवर पडू शकतो. 1989 मध्ये सोव्हियत महासंघाचे सैन्य अफगाणिस्तानातून बाहेर पडल्यावरही काही प्रमाणात प्रभाव दिसून आला होता. परंतु भारतीय सैन्य देखील कुठल्याही स्थितीला तोंड देण्यास सज्ज आहे. 1990 च्या दशकात सुमारे एक हजार विदेशी दहशतवादी काश्मीरमध्ये मारले गेले. यातील काही अफगाणी आणि बहुतांश पाकिस्तानी दहशतवादी होते.

Advertisement
Tags :

.