बजाज चेतक ईव्हीचे अपडेट मॉडेल होणार लाँच
9 जानेवारीपर्यंत नवीन मॉडेल सादर करण्याच्या तयारीत कंपनी
नवी दिल्ली :
दुचाकी निर्मितीमधील बजाज ऑटो सौंदर्यात बदल आणि यांत्रिक सुधारणांसह अपडेटेड चेतक या इलेक्ट्रिक स्कूटरचे सादरीकरण येत्या 9 जानेवारी 2024 रोजी करण्यात येणार असल्याची माहिती आहे. यामध्ये मोठ्या बॅटरी पॅकचा पर्याय मिळणार असून ही गाडी जळपास 127 किमीपर्यंत राहणार असल्याचा दावा कंपनीने केला आहे.
या गाडी संदर्भातील माहिती ही बजाज ऑटोचे लीक झालेले दस्तऐवज उघड करतात की, 9 जानेवारी रोजी अपडेटेड चेतक इलेक्ट्रिक
स्कूटर बाजारात आणण्याच्या तयारीत आहे. आगामी इलेक्ट्रिक स्कूटर चेतकचे प्रीमियम प्रकार आहेत. यामध्ये ग्राहकांना अनेक विविध फिचर्स मिळणार असल्याची माहिती आहे.
असे असतील फिचर्स
?2024 बजाज चेतकमधील इलेक्ट्रिक मोटार कार्यक्षमतेसाठी अपडेट करण्यात आली
?यासह सध्याच्या मॉडेलच्या 63 केएमपीएचच्या तुलनेत स्कूटरला 73 केएमपीएच टॉप स्पीड मिळणार असल्याचा दावा आहे.
?आगामी चेतक मोठ्या 3.2 केडब्लूएच बॅटरी पॅकसह सज्ज
?एका चार्जवर 127 किमी धावणार असल्याचा दावा
?सध्याच्या किंमतीपेक्षा अधिक किंमत राहणार
?अत्याधुनिक सुविधांयुक्त राहणार चेतक