For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Jyotiba Yatra | जोतिबा यात्रेचे वेगळेपण कायम; बेळगावच्या भाविकांनी जपली परंपरा

05:27 PM Apr 06, 2026 IST | NEETA POTDAR
jyotiba yatra   जोतिबा यात्रेचे वेगळेपण कायम  बेळगावच्या भाविकांनी जपली परंपरा
Advertisement

                            जोतिबा यात्रेची परंपरा आजही जिवंत

Advertisement

कागल  ( इम्रान मकानदार ) - चैत्र महिन्यात होणारी श्री जोतिबाची यात्रा काळानुसार बदलत गेली. सोयीसुविधा वाढल्या, प्रवासाचे स्वरूपही बदलले. मात्र एक परंपरा आजही तितक्याच निष्ठेने टिकून आहे आणि ती म्हणजे बैलगाडीतून जोतिबाच्या दर्शनासाठी जाण्याची. बेळगाव परिसरातील भाविकांनी ही परंपरा पिढ्यान् पिढ्या जपताना यंदाही भक्तीचा हा अनोखा प्रवास जिवंत ठेवला आहे.

आज दुचाकी, कार, बस, जीप, टेंपो अशी अनेक आधुनिक वाहने उपलब्ध असतानाही, जोतिबाच्या दर्शनासाठी बैलगाडीतून जाण्याचा आग्रह भाविक आजही सोडतनाहीत. यात्रेच्या चार दिवस आधीपासूनच जोतिबाच्या मार्गावर बैलगाड्यांची रांग लागते आणि भक्तीचा हा प्रवास उत्साहाने सुरू होतो. श्रद्धा आणि भक्तीच्यापिढ्यान् पिढ्या परंपरेचा अभिमानअनेक पिढ्यांपासून आमच्या कुटुंबातील भाविक बैलगाडीतूनच जोतिबाच्या चैत्र यात्रेसाठी जात आहेत. ही परंपरा जोपासत यंदा चौथ्या पिढीनेही बैलगाडीतून जाऊन जोतिबाचे दर्शन घेतले.

ऊन असूनही कोणताही त्रास जाणवला नाही, असे भांदूर गल्ली, बेळगाव येथील भाविक प्रकाश मुतकेर यांनी सांगितले.
पार करतात. बळावर ते हा कठीण प्रवास सहजश्रींचा नैवेद्य आणि पालखी सोहळा पार पडल्यानंतर आता बेळगाव भागातील भाविक परतीच्या प्रवासाला लागले आहेत. कोल्हापूर, कागल, निपाणी मार्गे बेळगावकडे जाणाऱ्या या बैलगाड्यांचा ओघ मोठ्या प्रमाणात दिसून आला.

Advertisement

सजवलेल्याबैलजोड्या, बैलगाड्यांवर छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज तसेच विविध देवदेवतांची प्रतिमा लावून भाविक भक्तिभावाने प्रवास करताना दिसत आहेत. त्यांच्या सोबत बैलांसाठी सरकी, भरडा, पेंड असा पौष्टिक आहार, तसेच स्वतः साठी स्वयंपाकाचे साहित्य आणि आवश्यक सामानही असते.

Advertisement
Tags :

.