मळगाव गावची अनोखी कळसवणी परंपरा
न्हावेली / वार्ताहर
सुप्रसिद्ध सोनुर्ली माऊलीचा गाव अर्थात सोनुर्ली मळगाव या गावातील शिमगोत्सवातील एक प्रचलित व अनोखी परंपरा म्हणजे कळसवणी परंपरा शिमगोत्सवाच्या सातव्या दिवशी पहाटे चार वाजता दोन कलशांमध्ये तीर्थ घेऊन प्रथम चव्हाट्याच्या होळीकडे म्हणजेच रवळनाथ मंदिराकडे या कळसवणीची सुरुवात होते. तिथून मायापूर्वचारी मंदिर,भूतनाथ मंदिर,मठ त्यानंतर गावातील प्रत्येक घरामध्ये जाऊन हे कळसातील तीर्थ दिले जाते.पाच हजाराहून अधिक लोकवस्ती आणि दोन हजार घरे असलेल्या मळगावात हा कलश अक्षरश : रिले पद्धतीने फिरत असतो.यावेळी घराघरात या कलशाचं पूजन करून गाऱ्हाणी घातली जातात.त्यानंतर सर्वांना देवाचं कलशातील तीर्थ दिलं जात हि अनोखी परंपरा कळसवणी म्हणून प्रचलित आहे.हा कलश दुपारपर्यत पूर्ण गाव फिरून मंदिरात परत आणला जातो.मळगाव गावात वर्षानुवर्षे हि परंपरा अखंडितपणे सुरु आहे.