For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अनोखे अन् रहस्यमय व्हॅली ऑफ किंग्स

06:30 AM Feb 20, 2025 IST | Tarun Bharat Portal
अनोखे अन् रहस्यमय  व्हॅली ऑफ किंग्स
Advertisement

इजिप्तमधील जागतिक वारसास्थळ

Advertisement

इजिप्तच्या संस्कृतीची रहस्यं आकर्षित करत असतील तर पिरॅमिड्ससोबत व्हॅली ऑफ किंग्सला अवश्य भेट द्या. दक्षिण इजिप्तमध्ये लक्सरनजीक नाइल नदीच्या पश्चिम काठावर असलेले किंग्सचे खोरे एक महत्त्वाचे ऐतिहासिक स्थळ आहे. हे प्राचीन इजिप्तच्या साम्राज्य काळादरम्यान अनेक फिरौन, राणी अणि उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची दफनभूमी आहे. खडकांना कापून तयार करण्यात आलेल्या थडग्यांसाठी प्रसिद्ध हे खोरे युनेस्कोचे जागतिक वारसास्थळ असून जगभरातील पर्यटक येथे आकर्षित होत असतात.

इजिप्तमध्ये ख्रिस्तपूर्व 1550 ते ख्रिस्तपूर्व 1070 दरम्यान इजिप्तमध्ये एका नव्या राजघराण्याचे राज्य होते. याच्या राजाला फैरो म्हटले जाते, जो अत्यंत शक्तिशाली होता. त्याच्या काळात कला, वास्तुकला आणि व्यापार विशेष स्वरुपात बहरला होता. किंग्सचे खोरे थडग्यांचे एक आकर्षक संग्रह असून ज्यात आतापर्यत 63 थडग्यांचा शोध लागला आहे. यात केवळ फैरोसाठीच नव्हे तर राजघराण्याचे सदस्य आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांचीही थडगी आहेत.

Advertisement

हे खोरे जुन्या इजिप्तच्या परंपरागत थडग्यांच्या स्वरुपात प्रसिद्ध पिरॅमिडपेक्षा अत्यंत वेगळ्या प्रकारच्या थडग्यांचे खोरे आहे. त्यापूर्वी इजिप्तमध्ये पिरॅमिड्समध्ये थडगी तयार केली जात होती, ज्यात केवळ शाही थडगी असायची. हा बदल एका खास कारणामुळे करण्यात आला होता. थडग्यांना लुटण्यापासून वाचविण्यासाठी खडकांना कापून थडगी तयार करण्यात आली होती.

किंग्स खोऱ्यातील सर्वात रंजक शोध तूतनखामुनचे थडगे आहे. हे थडगे एखाद्या पिरॅमिडमधून निघाले असल्याची सामान्य धारणा आहे, परंतु किंग्स खोऱ्याचा पिरॅमिड्सशी संबंध नाही. तूतनखामूनच्या या थडग्याला किंग टट देखील म्हटले जाते. ब्रिटिश पुरातत्व तज्ञ हॉर्वर्ड कार्टर यांनी याचा शोध लावला होता. थडग्यामध्ये मोठ्या प्रमाणात खजिना होता तसेच त्यातील ममीवर प्रसिद्ध सोन्याचा मुखवटा मिळाला होता, ज्याने इजिप्तला पुन्हा जगभरात प्रसिद्धी मिळवून दिली होती.

थडग्यांसाठी किंग्स खोऱ्याची निवड विचारपूर्वक करण्यात आली होती. ही थडगी आकार, जटिलता आणि डिझाइनच्या दृष्टीकोनातून अत्यंत वेगळी आहेत. काही थडग्यांमध्ये एकच चेम्बर होते, तर काहींमध्ये अनेक खोल्या, मार्गिका अणि मृतदेह दफन करण्यासाठी वेगवेगळे चेम्बर होते. या चेम्बर्सना वेगवेगळ्या प्रकारे सजविण्यात आले होते आणि यात फैरोच्या जीवनानंतरच्या प्रवासाविषयी वर्णन दर्शविणारी आकर्षक चित्रे रेखाटण्यात आली होती.

थडग्यांचे डिझाइन आणि आकाराची जटिलता अत्यंत आकर्षक आहे. अनेक थडगी तर अत्यंत रहस्यमय आहेत. परंतु थडग्यांचा आकार दफन करण्यात आलेल्या माणसाची प्रतिष्ठा दर्शवितो. अधिकाऱ्यांची थडगी सरळ आकाराची होती तर फैरोची थडगी अनेक चेम्बरयुक्त अन् आलिशान होती. याचबरोबर फैरोची थडगी काही प्रमाणात रहस्यमय होती. परंतु या थडग्यांना अत्यंत गोपनीय ठेवण्यात आले होते हे स्पष्ट आहे. किंग्स खोऱ्याला अनेकदा खजिन्याशी जोडले जाते. बहुतांश थडग्यांना प्राचीन काळात लुटण्यात आले. धन आणि मूल्यवान कलाकृतींच्या शोधात प्राचीन थडग्यांमध्ये लुटारू अनेकदा आत शिरण्यास यशस्वी ठरले. अनेक थडग्यांमधून मूल्यवान सामग्री नेण्यात आली. यामुळे केवळ रिकामी कक्ष राहिले आहेत. परंतु लूट झाल्यावरही काही थडगी चोरांच्या नजरेपासून वाचली आहेत. यामुळे त्या काळातील दफनप्रथा आणि भौतिक संस्कृतीविषयी अमूल्य पुरातात्विक आणि ऐतिहासिक माहिती मिळाली आहे.

Advertisement
Tags :

.