केंद्रीय गृहमंत्री आज शिलाँगला भेट देणार
07:00 AM Jun 04, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
ईशान्य विकास योजनांचा आढावा घेणार
Advertisement
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह गुरुवार, 4 जून रोजी शिलाँगला भेट देणार असून ईशान्य परिषदेच्या (एनईसी) 73 व्या पूर्ण सत्राचे अध्यक्षस्थान भूषवतील. या बैठकीत ईशान्य प्रदेशाच्या विकासाशी संबंधित अनेक महत्त्वाच्या मुद्यांवर चर्चा होईल. तसेच ईशान्येतील विकास योजनेचा आढावा घेतला जाणार आहे. या बैठकीत पर्यटन, कृषी, फलोत्पादन आणि गुंतवणूक प्रोत्साहन यावर लक्ष केंद्रित केले जाईल. या परिषदेंतर्गत बुधवारी झालेल्या बैठकीत बांबू, अगरवुड, अष्टलक्ष्मी दर्शन आणि इतर महत्त्वाच्या प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला. गुरुवारी होणाऱ्या पूर्ण सत्रात विविध क्षेत्रांच्या विकासासाठी स्थापन केलेल्या मुख्यमंत्र्यांच्या उच्चस्तरीय कार्यदलाच्या प्रगतीवर चर्चा केली जाईल, असे सांगण्यात आले.
Advertisement
Advertisement