महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

अज्ञात वाहनाची धडक ; काका-पुतण्या जागीच ठार

11:19 AM Sep 20, 2024 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

नाणीजजवळ रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावर झाला अपघात

Advertisement

पाली / वार्ताहर -:

Advertisement

रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावर नाणीज जुन्या मठाजवळ गुरुवारी सकाळी एक भीषण अपघात होऊन नाणिज गावातील दुचाकीस्वार काका-पुतणे जागीच ठार झाले.या अपघाताबाबत पाली पोलीस दूरक्षेत्रातून मिळालेली माहिती अशी की, गुरुवारी सकाळी ८.३० वाजण्याच्या दरम्यान मिऱ्या नागपूर राष्ट्रीय महामार्गावरून वेल्डींगच्या कामासाठी नाणीज येथून पालीच्या दिशेने दुचाकी क्र.एम एच ०८ ए एम ४९०३ घेऊन अरुण अनंत दरडी (३५ ) व रामचंद्र देवजी दरडी (६५, दोघेही रा. दरडीवाडी, नाणीज) हे दोघेजण वेल्डींगच्या कामासाठी खानू येथे दुचाकीवरुन येत असताना नाणीज जुन्या मठाजवळ पाठीमागून येणार्‍या अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली. यात हे दोघे महामार्गावर पडून गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने उपचारार्थ पाली ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकार्‍यांनी तपासून ते मृत झाल्याचे सांगितले.

Advertisement
Tags :
# tarun bharat news # ratnagiri # accident
Next Article