तिच्या आईवडिलांनी आरोप केला की, लग्नापासूनच ट्विशाचा पती आणि सासू तिचा हुंड्यासाठी छळ करत होते. दरम्यान, गिरीबाला सिंग यांनी आपल्या जामीन अर्जात सुनेवर गंभीर आरोप केले आहेत. अर्जात असा दावा करण्यात आला आहे की, तिला अमली पदार्थांचे व्यसन असून, जेव्हा तिला अमली पदार्थ मिळत नसत, तेव्हा ती विचित्र वागत असे.
Twisha Sharma Case अखेर सुनेच्या मृत्यू प्रकरणात माजी न्यायाधिशाला अटक...ट्विषा शर्मा प्रकरणात ट्विस्ट वाढला
भोपाळच्या त्विषा शर्मा खून प्रकरणाला आज नवी कलाटणी मिळाली आहे. सुनेच्या अकस्मित आणि संशयास्पद मृत्यूप्रकरणी आता माजी न्यायाधिश गिरीबाला सिंह यांना अटक करण्यात आली आहे. सीबीआयने गुरुवारी दुपारी सुनेच्या मृत्यूप्रकरणात त्यांना अटक केली आहे.
ट्विषा शर्मा प्रकरण काय आहे?
लग्नानंतर पाच महिन्यांनी भोपाळमधील सासरच्या घरी मृत आढळलेल्या नोएडा येथील रहिवासी ट्विशा शर्मा यांचा शवविच्छेदन अहवाल आला आहे. या अहवालात त्यांच्या डोक्याला, कानांना आणि हातांना झालेल्या जखमांची पुष्टी झाली होती.
त्विषा यांना झालेल्या या जखमा मृत्यू होण्यापूर्वी होत्या असे तपासात समोर आले होते. मृत्यूच्या काही वेळ आधी त्विषा यांनी आपल्या आईशी व्हॉट्स अपवर केलेलं चॅटही माध्यमांच्या हाती लागले होते. नंतर पोलिसांच्या हाती लागलेल्या सीसीटिव्ही फूटेजमुळे या प्रकरणाचे गूढ आणखी वाढले होते.
हुंडाबळीचा खटला
दरम्यान, हुंडाबळी प्रकरणातील आरोपी पती समर्थ सिंगच्या जामीन अर्जावर सोमवारी जिल्हा न्यायालयात सुनावणी झाली. न्यायाधीश पल्लवी द्विवेदी यांच्या न्यायालयाने आरोपीचा अर्ज फेटाळला. दरम्यान, डीसीपी विवेक सेहवाल यांनी फरार आरोपीसाठी १०,००० रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. ट्विशाच्या सासू, निवृत्त जिल्हा व सत्र न्यायाधीश गिरीबाला सिंग यांना शुक्रवारी न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला होता.