For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

४२ वर्षे सुरू राहिला टीव्ही

06:50 AM Aug 24, 2026 IST | Tarun Bharat Portal
४२ वर्षे सुरू राहिला टीव्ही
Advertisement

जगात अशा अनेक घटना समोर येतात, ज्या लोकांना चकित करत असतात. अशीच एक घटना क्रोएशियाची राजधानी जाग्रेबशी संबंधित आहे. तेथे एका महिलेचा मृतदेह जवळपास 42 वर्षांनी तिच्या फ्लॅटमधून हस्तगत झाला. तेथील खोलीचे दृश्य जणू काळ थबकला आहे असेच होते. ही घटना हेडविला गोलिक नावाच्या महिलेशी संबंधित असून तिची कहाणी आजही जगातील सर्वात रहस्यमय घटनांपैकी एक मानली जाते. हेडविगा गोलिकचा जन्म 1924 साली झाला होता. शेजाऱ्यांनी तिला अखेरच 1966 साली पाहिले होते. यानंतर ती अन्यत्र कुठे रहायला गेली असे लोकांना वाटले. परंतु त्याच फ्लॅटमध्ये ती मृतावस्थेत असू शकते याची कल्पनाही कुणी केली नाही.

Advertisement

42 वर्षांनी दरवाजा खुलला

2008 साली अधिकारी आणि बेलिफ (न्यायालयीन अधिकारी)ने फ्लॅटच्या मालकीशी निगडित एका प्रकरणाच्या चौकशीदरम्यान दरवाजा खुला करविला होता. पोलीस आणि अधिकारी आत पोहोचल्यावर त्यांच्यासमोर स्तब्ध करणारे दृश्य होते. खोलीत एक जुना टीव्ही, फर्निचर अन् चहाचा कप ठेवलेला होता. खुर्चीनजीक ब्लँकेट गुंडाळून घेतलेल्या महिलेचा ममीसारखा मृतदेह मिळाला. खोलीतील गोष्टी अनेक वर्षांपर्यंत स्वत:च्या जाग्यावर होत्या. याचमुळे या घटनेला अनेक वृत्तपत्रांनी =‘फ्रोजन इन टाइम“ शीर्षक दिले होते.  महिला पाहत होती टीव्ही

Advertisement

हेडविगा चहाचा कप घेऊन स्वत:च्या पसंतीच्या खुर्चीवर बसून टीव्ही पाहत होती. त्याचवेळी तिचा मृत्यू झाला. परंतु तिच्या मृत्यूचे अचूक कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. परंतु तिचा टीव्ही मात्र सुरूच राहिला होता. हेडविगा अन्यत्र कुठेतरी रहायला गेली अशी कल्पना शेजाऱ्यांनी करून घेतली होती. याचमुळे आत जाऊन कुणी चौकशी केली नव्हती. 2008 साली फ्लॅट उघडण्यात आल्यावर रहस्य समोर आले.

Advertisement
Tags :

.