For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

डाटा केंद्रांची उलाढाल वेगाने वाढणार

06:01 AM Apr 15, 2026 IST | Tarun Bharat Portal
डाटा केंद्रांची उलाढाल वेगाने वाढणार
Advertisement

भारतातील उलाढाल 22 अब्ज डॉलर्सवर पोहचणार : केंद्रांची क्षमता 100 गिगावॅटपर्यंत वाढणार

Advertisement

जागतिक डाटा केंद्रांची बाजारपेठ भारतामध्ये सातत्याने विस्तारत असून या केंद्रांची उलाढाल 2030 पर्यंत 22 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचू शकते. भारतातील डाटा केंद्रांचे एकंदर मूल्य 2025 मध्ये अंदाजे 10 अब्ज डॉलर्सचे होते. येत्या काळात जागतिक डाटा केंद्रांच्या विस्ताराचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात होत असून सध्याला असणारी 40 ते 50 गिगावॅट इतकी स्थापन क्षमता 2030 पर्यंत 100 गिगावॅटपर्यंत पोहोचण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

वृत्तसंस्था/नवी दिल्ली

Advertisement

क्लाऊड कम्प्युटिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि डाटा आधारित तंत्रज्ञानाच्या वेगाने होणाऱ्या विस्तारामुळे जागतिक डाटा केंद्रांची प्रगती मोठ्या प्रमाणात होत आहे. आशिया-प्रशांत क्षेत्रामध्ये भारत या बाबतीत एक महत्त्वाचे केंद्र बनू पाहते आहे. देशातली वाढती डिजिटल अर्थव्यवस्था, इंटरनेट वापरकर्त्यांच्या संख्येमध्ये होणारी वाढ त्याचप्रमाणे या क्षेत्रात नव्याने होणारी गुंतवणूक यामुळे डाटा केंद्रे भारताच्या अर्थव्यवस्थेत महत्त्वाचे योगदान देत आहेत.

उलाढालीत नवे लक्ष्य गाठणार

2030 पर्यंत भारतातील डाटा केंद्रांचा उलाढालीचा टप्पा 22 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. इंटरनेट आणि दूरसंचार ग्राहकांची वाढती संख्या, उद्योजकांकडून क्लाऊड सेवेचा होणारा वापर, आर्टिफिशीयल इंटेलिजन्स आणि उच्च प्रगतीचे कम्प्युटिंग तसेच डिजिटल देवाणघेवाण आणि ओटीपीच्या बाबतीत ग्राहकांचा कल जास्तीत जास्त वाढताना दिसतो आहे.

 विदेशी गुंतवणूक अधिक

एवढेच नाही तर भारतातील डाटा केंद्र उद्योग जागतिक पातळीवर तसेच देशांतर्गत पातळीवरील गुंतवणूकदारांना आकर्षित करण्याकडेही यश मिळवत आहे. 2020 ते 2024 या कालावधीमध्ये डाटा केंद्रांच्या क्षेत्रामध्ये जवळपास 13 ते 15 अब्ज डॉलरची गुंतवणूक करण्यात आली आहे. यामध्ये विदेशी गुंतवणूकदारांची हिस्सेदारी 80 टक्के इतकी आहे.

भारतात डाटा केंद्रांचा निर्मिती खर्च कमी

भारतात डाटा केंद्रांच्या स्थापनेसाठी पुरेशी संधी आहे. डाटा केंद्र स्थापण्यासाठी अंदाजे 60 ते 70 लाख डॉलर प्रति मेगावॅट इतका खर्च भारतात येत असतो. इतर देशांच्या तुलनेत हा खर्च खूप कमी आहे. सिंगापूर आणि जपानसारख्या देशांपेक्षा आशिया-प्रशांत बाजारांपेक्षा भारतात खर्च कमी येतो. हेच कारण भारतात विदेशी गुंतवणूक वाढण्यामागचे सांगितले जात आहे. मेट्रोसह आता टायर 2 शहरांतही विस्तार होत आहे.

Advertisement
Tags :

.