सहकारी संस्था निवडणुकीचा लवकरच बिगुल वाजणार
सांगली :
वर्षभर लांबणीवर पडलेल्या सहकारी संस्थांसह साखर कारखाने, गृहनिर्माण सोसायट्यांच्या निवडणुकीचा बिगुल लवकरच वाजणार आहे. जिह्यातील किमान सव्वाशे सहकारी संस्थांच्या तातडीने निवडणुका होण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने आतापासूनच राजकीय कार्यकर्त्यांनी तयारी सुरू केली आहे.
विधानसभेच्या निवडणुकांमध्ये गेल्या महिन्यात राज्य शासनाने सहकारी संस्थांच्या निवडणुकांना 31 ऑक्टोबर रोजी स्थगिती दिली होती. आता विधानसभेच्या निवडणुकीची आचारसहिता संपली आहे. नवीन वर्षापासून राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजणार आहे.विधानसभेच्या निवडणुकीच्या कामकाजासाठी सहकार विभागातील अधिकारी-कर्मचार्यांच्या सेवा अधिग्रहित केल्यास सहकारी संस्थांच्या निवडणुका पार पाडण्यात येणाऱ्या अडचणी विचारात घेता राज्य शासनाने निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता.
2024-25 या वर्षात काही सहकारी संस्थांच्या निवडणुका सुरू आहेत. जूनमध्ये राज्यातील पावसाची स्थिती विचारात घेऊन शासनाने 20 जून रोजी राज्यातील सहकारी संस्थांची निवडणूक प्रक्रिया 30 सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलली होती. राज्य सहकारी निवडणूक प्रा†धकरणाने 1 ऑक्टोबरपासून सहकारी संस्थांच्या निवडणूक प्रक्रिया पुन्हा सुरू करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर राज्य शासनाने ऑक्टोबर महिन्यात प्रधिकरणाच्या आदेशाला स्थगिती देत या निवडणुका पुढे ढकलण्याचा आदेश सहकार विभागाचे अवर सचिवांनी काढला होता. विधानसभा निवडणुकांमध्ये महायुतीला बहुमत मिळाल्याने आता साखर कारखाने, विविध कार्यकारी सोसायट्या यांच्या निवडणुका घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.