For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

युनायटेड, दैवज्ञ चॅम्पियन संघांची विजयी सलामी

10:02 AM Feb 07, 2024 IST | Tarun Bharat Portal
युनायटेड  दैवज्ञ चॅम्पियन संघांची विजयी सलामी
Advertisement

दैवज्ञ सुवर्ण महोत्सवी क्रिकेट स्पर्धा

Advertisement

बेळगाव : दैवज्ञ स्पोर्ट्स क्लब व दैवज्ञ सहकार बँक त्यांच्या संयुक्त विद्यमाने 25 व्या दैवैद्य बँक चषक निमंत्रतांच्या आंतरराज्य टेनिस बॉल स्पर्धेत उद्घाटन दिवशी युनायटेड इलेव्हनने साईराम संघाचा तर दैवज्ञ चॅम्पियन सिद्धी विनायक संघाचा पराभव करून विजय सलामी दिली. व्हॅक्सिन डेपो मैदानावरती आयोजित केलेल्या दैवज्ञ चषक क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून होण्णावर मठाचे  सच्चिदानंद जानेश्वर भारती महास्वामीजी, दयानंद नेतलकर, उदय शंकर भट, गुरुप्रसाद पावसकर, प्रभू वेर्णेकर, तेजस्विनी अणवेकर, दीनानाथ रेवणकर, महाबळेश्वर शेजेकान, वैभव वेर्णेकर व दीपक कोलवेकर आदी मान्यवर उपस्थित होते. पाहुण्यांच्या हस्ते दिपप्रज्वलन, यष्टीचे पूजन करून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी दैवज्ञ स्पोर्ट क्लबचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते आजच्या पहिल्या सामन्यात युनायटेड ईलेव्हनने प्रथम फलंदाजी करताना 10 षटकात 4 गडी बाद 98 धावा गेल्या. प्रत्युत्तरादाखल खेळताना ओम साईराम संघाने 10 षटकात 6 बाद 71 धावाच केल्या. दुसऱ्या सामन्यात सिद्धिविनायक संघाने प्रथम फलंदाजी करताना 10 षटकात 5 गडीबाद 63 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल खेळताना दैवज्ञ चॅम्पियन संघाने 9.4 षटकात 3 गडीबाद 66 धावा करून सामना 7 गड्याने जिंकला.

Advertisement
Advertisement
Tags :

.