महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

खेडच्या गिर्यारोहकांनी सर्वोच्च शिखरांवर फडकवला तिरंगा! नेपाळ-तिबेट सीमेवर सहा जणांची साहसी कामगिरी

03:09 PM Sep 27, 2024 IST | Abhijeet Khandekar
the Nepal-Tibet border
Advertisement

६ दिवसात १७,५९८ फूट उंचीवरील शिखर केले सर, विकमाला पुन्हा गवसणी, सर्वच स्तरांतून कौतुकाचा वर्षावर

Advertisement

राजू चव्हाण खेड

मनाला सर्वात जास्त सुख, समाधान व आनंद छंदातून मिळत असतो. या छंदांची अव्याहतपणे जोपासना करणाऱ्या येथील सहा हौशी गिर्यारोहकांनी नेपाळमधील जगातील सर्वोच्च शिखरावर अटकेपार तिरंगा फडकवण्याची साहसी कामगिरी केली. सलग ६ दिवसात समुद्र सपाटीपासून ५३६४ मीटर उंच व १७,५९८ फूट उंचीवरील नेपाळ व तिबेटाच्या सिमेवर असलेला माऊंट एव्हरेस्ट बेस कॅम्प सर करत पुन्हा एकदा विक्रमाला गवसणी घातली आहे. या धाडसी गिर्यारोहकांचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.

Advertisement

आजच्या धकाधकीच्या जीवनात एखादा छंद जोपासणे ही तशी अवघड बाब म्हणावी लागेल. गिर्यारोहणाच्या छंदात स्वत:च्या सामर्थ्यावर, सहनशीलतेवर व निर्णयबुद्धीवर अवलंबून रहावे लागते. निसर्गच गिर्यारोहकाला कार्यक्षेत्र देतो अन् विरोधही करतो. मानवजात विरूद्ध निसर्ग असा हा अद्वितीय व चित्तथरारक छंद आहे. या छंदातील धोकेच माणसाला गिर्यारोहणासाठी अधिकाधिक प्रवृत्त करत आले आहेत. याचीच प्रचीती येथील 6 गिर्यारोहकांनी घडवून आणली.

शहरातील डॉ. उपेंद्र तलाठी, जोगेश साडविलकर, अभय तलाठी, संकेत बुटाला, संदीप नायकवडी व पुणे-दौंडचे डॉ. संदीप कटारिया या ६ गिर्यारोहकांनी साहसी छंद जोपासत नेपाळसारख्या अतिउंच व खराब वातावरणातूनही शिखर सर करताना लौकिकास साजेशी कामगिरी केली आहे. नेपाळमधील दक्षिण बेस कॅम्प हा जगातील सर्वात ट्रेकिंग अवघड मार्ग आहे. या ठिकाणी जगातून दरवर्षी हजारो गिर्यारोहक भ्रमंतीसाठी जातात. या गिर्यारोहकांनीही सलग ६ दिवस पायपीट केली. धाडसाने आगेकूच करत शिखरावर तिरंगा झेंडा फडकवला.

जगातील सर्वोच्च गणला जाणारा नेपाळमधील माऊंट एव्हरेस्ट शिखर सर करण्याचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या येथील सहाही गिर्यारोहकांनी नियोजनाची महिनाभरापूर्वीच तयारी केली होती. जगातील सर्वोच्च शिखर असणाऱ्या नेपाळ व तिबेटच्या सीमेवरील माऊंट एव्हरेस्ट शिखरावर जाणे तसे सोपे नव्हते. अति उंचावरील खराब वातावरणामुळे अनेक गिर्यारोहकांना याठिकाणी प्राणही गमवावे लागले आहे. अशाही परिस्थितीत जिद्द व चिकाटीच्या बळावर शिखर सर करत गिर्यारोहकांनी स्वत:चा प्रस्थापित केलेला विक्रम मोडीत काढला आहे.

Advertisement
Tags :
tarun bharat newsthe Nepal-Tibet borderthe tricolor the highest
Next Article