For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

4 ऑक्टोबरपासून पाहता येणार ‘द ट्राइब’

06:43 AM Oct 02, 2024 IST | Tarun Bharat Portal
4 ऑक्टोबरपासून पाहता येणार ‘द ट्राइब’
Advertisement

अलाना पांडे करणार ओटीटी पदार्पण

Advertisement

अभिनेत्री अनन्या पांडेची चुलत बहिण आणि सोशल मीडिया इन्फ्लुएंसर अलाना पांडे मागील काही काळापासून स्वत:च्या वैयक्तिक आयुष्यावरून चर्चेत आहे. अलाना अलिकडेच आई झाली असून ती लॉस एंजिलिसमध्ये राहते. काही काळापूर्वी ती स्वत:च्या पतीसोबत भारतात आली होती. अलाना देखील लवकरच अभिनयाच्या क्षेत्रात पाऊल ठेवणर आहे.

तिची पहिली वेबसीरिज ‘द ट्राइब’ची घोषणा झाली आहे. करण जौहर याचा निर्माता असणार आहे. या शोमध्ये अलानासोबत जावेद जाफरीची मुलगी अलाविया, सृष्टी पोरे, अल्फिया जाफरी, अर्याना गांधी आणि हार्दिक जवेरी असणार आहे.

Advertisement

द ट्राइबला ओमदार पोतदार दिग्दर्शित करत आहे. हा शो 4 ऑक्टोबर रोजी प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित होणार आहे. मोठी स्वप्ने पाहण्याची हिंमत करा असे बोलले जाते आणि या ट्राइबने असेच केले आहे असे या सीरिजचे पोस्टर शेअर करत निर्मात्यांनी म्हटले आहे.

हा शो लॉस एंजिलिसमध्ये जागतिक ओळख प्राप्त करण्याच्या उद्दिष्टासोबत गेलेल्या यंग इन्फ्लुएंसरवर आधारित आहे. यात 5 श्रीमंत भारतीय कंटेंट क्रिएटर्सच्या ग्लॅमरस जगाच्या पडद्यामागील कहाणी आहे. हे सर्व जण सोशल मीडिया करियर निर्माण करण्यासाठी लॉस एंजिलिस येथे पोहोचले होते. द ट्राइबची निर्मिती करण जौहर, अपूर्व मेहता आणि अनीशा बेग यांनी केली आहे.

Advertisement
Tags :

.