वजन घटविण्यासाठी अजब स्नॅक्सचा ट्रेंड
वजन कमी करण्यासाठी लोक अनेकदा कमी आहार, व्यायाम करणे किंवा कमी कॅलरीयुक्त गोष्टी खाणे सुरू करतात. परंतु चीनमध्ये काही युवांदरम्यान वजन घटविण्याची एक अशी पद्धत चर्चेत आहे, जी कळल्यावर तुम्ही चकित व्हाल. तेथे काही युवा चविष्ट आणि पसंतीच्या स्नॅक्सपासून अंतर राखत बेस्वाद आणि चावण्यास अवघड स्नॅक्स खात आहेत. जर कुठलीही गोष्ट लवकर संपत नसेल तर माणूस दीर्घकाळापर्यंत त्याला चावत राहील आणि खाण्याची इच्छा काही प्रमाणात कमी होईल असा विचार या ट्रेंडमागे आहे. सोशल मीडियावर अशाप्रकारचे स्नॅक्स आणि वजन घटविण्याच्या प्रयत्नांवरून मोठी चर्चा होत आहे.
सर्वसाधारणपणे स्नॅक्सचे नाव ऐकताच लोकांच्या मनात चिप्स, चॉकलेट, बिस्किट किंवा इतर स्वादिष्ट गोष्टी येतात. परंतु या नव्या ट्रेंडमध्ये प्रकरण अत्यंत उलट आहे. येथे अशा स्नॅक्सना पसंत केले जातेय, ज्यांचा स्वाद अत्यंत चांगला नसतो आणि ज्यांना खाण्यासाठी मेहनत करावी लागते. यातील काही प्रकारचे चावावे लागणारे खाद्यपदार्थ सामील ओत. त्यांचा उद्देश स्वादाचा आनंद घेणे नाही तर दीर्घकाळापर्यंत खाण्याची प्रक्रिया जारी ठेवणे आहे. म्हणजेच एकीकडे सामान्य स्नॅक्स काही मिनिटांत संपतात, तर या गोष्टी हळूहळू आणि दीर्घ वेळेपर्यंत चावत रहावे लागतात.
अखेर असे का करत आहेत लोक?
यामागे एक साधार विचार आहे. जर कुठलाही व्यक्ती स्वादिष्ट आहार घेत असेल तर तो अनेकदा गरजेपेक्षा अधिक खात असतो. याच्याउलट बेस्वाद आणि कमी आकर्षक पदार्थ खाण्यातील रुची कमी होऊ शकते. तसेच स्नॅक्स चावण्यास अधिक वेळ लागल्यास खाण्याचा वेग देखील मंदावू शकतो. याचमुळे काही युवा याला वजन नियंत्रित करण्याच्या एका सोप्या पद्धतीच्या स्वरुपात पाहत आहेत. परंतु कुठल्याही ट्रेंडला पाहून त्याला वजन घटविण्याची निश्चित पद्धत मानले जाऊ नये.
सोशल मीडियाने वाढविला ट्रेंड
सद्यकाळात आहाराशी निगडित अनेक ट्रेंड सोशल मीडियाद्वारे वेगाने लोकप्रिय होतात. कुठलाही व्यक्ती स्वत:च्या वजन घटविण्याची पद्धत शेअर करतो, तेव्हा इतर लोकही ती आजमावू लागतात. चीनमध्ये देखील अशाप्रकारचे स्नॅक्स आणि त्याच्याशी निगडित वजन घटविण्याच्या पद्धतीची ऑनलाइन चर्चा सुरू आहे. काही युवा स्वत:चे अनुभव शेअर करत आहेत आणि कुठल्याही स्वादिष्ट पदार्थाच्या जागी कमी स्वाद अन् चावण्यासाठी अधिक वेळ घेणाऱ्या पर्यायाची निवड करत असल्याचे सांगत आहेत.
वजन घटणार का?
कुठल्याही एका स्नॅकला खाल्ल्याने वजन कमी होण्याची हमी मिळत नाही. वजनावर एकूण आहार, दैनंदिन शारीरिक हालचाली आणि व्यक्तीच्या जीवनशैलीचा प्रभाव पडतो. कुठलाही व्हायरल ट्रेंड पाहून स्वत:च्या आहारात मोठा बदल करणे योग्य नाही. खासकरून एखादा व्यक्ती दीर्घकाळापर्यंत वजन घटविण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला नियंत्रित आणि पौष्टिक आहार घेणे आवश्यक आहे. या ट्रेंडची सर्वात रंजक बाब म्हणजे जेथे जगभरातील लोक स्वादिष्ट परंतु कमी कॅलरीयुक्त स्नॅक्सचा शोध घेत असतात, तर चीनचे काही युवा चवीकडे दुर्लक्ष करत दीर्घकाळापर्यंत चावता येणाऱ्या स्नॅक्सना वजन घटविण्यासाठी आजमावत आहेत.