चमच्याने भिंत कापण्याचा ट्रेंड व्हायरल
अत्यंत विचित्र कृत्याने वेधले लक्ष
सोशल मीडियावर कंटेंटच किंग असल्याचे म्हटले जाते. जितका चांगला कंटेंट तितके ह्यूज, परंतु प्रत्येकवेळी ही बाब सत्य ठरत नाही. अनेकदा अत्यंत साधारण आणि अजब दिसणारे व्हिडिओ देखील दशलक्ष ह्यूज प्राप्त करतात. सध्या एक असाच ट्रेंड व्हायरल होत असून याला लोक व्हायरल स्पून चॅलेंज ठरवत आहेत. या ट्रेंडची संकल्पना अत्यंत साधी आहे. क्रिएटर कॅमेऱ्यासमोर भिंतीवर चमच्याने वार करतात आणि जितके फॉलोअर्स असतील तितक्याचवेळा चमच्याने भिंतीवर स्क्रॅच करणार असल्याचे सांगतात. हा प्रकार प्रत्येक दिनी चालतो, फॉलोअर्सची संख्या वाढण्यासोबत भिंतीवर स्क्रॅचची संख्याही वाढत जाते.
अनेक व्हिडिओची सुरवात ‘डे वन’द्वारे होते. आज चमच्याने भिंत कापण्याचा पहिला दिवस असे क्रिटएर म्हणतो. एक फॉलोअर असेल तर एक स्व्रॅच मारतो. दुसऱ्या दिवशी दोन फॉलोअर्स झाल्यास दोन स्क्रॅच. अशाप्रकारे व्हिडिओला दररोज अपडेट केले जाते. काही क्रिएटर थट्टेच्या सुरात तुम्ही फॉलो करू नका, नाही तर माझी आई मला मारेल, असे म्हणतात.
फॉलोअर्स वाढविण्याची ट्रीक
हा ट्रेंड आता केवळ भिंतीपुरती मर्यादित राहिलेला नाही. काही व्हिडिओंमध्ये क्रिएटर आज चमच्याने नदी खाली करण्याचा डे वन असल्याचे म्हणत असल्याचे दिसून येते. एक फॉलोअर असेलतर एक चमचा पाणी बाहेर काढू, उद्या जितके फॉलोअर्स वाढतील, तितके चमचे पाणी काढू. अशाप्रकारे फॉलोअर्सची संख्या थेट पुनरावृत्ती होणाऱ्या कामाशी जोडण्यात येत आहे. असे साधारण व्हिडिओही लाखो-कोट्यावधी ह्यूज मिळवत आहेत. याकरता मोठ्या एडिटिंगची गरज नाही, तसेच चेहरा दाखविण्याची गरज नाही. केवळ एक चमचा आणि दररोजची गणना आवश्यक आहे. सोशल मीडियाच्या जगतात काय व्हायरल होईल याचा अंदाज लावणे अवघड आहे. सध्या चमच्याने भिंतीवर पडणारे स्क्रॅच लोकांचे लक्ष वेधून घेत आहेत.