महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

कॅम्प येथील ‘तो’ वृक्ष अखेर हटविला

12:17 PM Oct 21, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बेळगाव : कॅम्प येथील इंडिपेंडंट रोडवरील धोकादायक वृक्ष पूर्णपणे हटविण्याची मागणी केली होती. कॅन्टोमेंट अधिकाऱ्यांनी धोकादायक झाडाचा पाहणी करून हा जुनाट वृक्ष हटविला आहे. त्यामुळे स्थानिक रहिवाशातून समाधान व्यक्त होत आहे. मंगेश होंडा मागील बाजूला असलेल्या इंडिपेंडंट रोडवर धोकादायक वृक्ष होता. महिनाभरापूर्वी या वृक्षाची फांदी पडून घराचे नुकसान झाले. तसेच एक महिला सुदैवाने बचावली. त्यामुळे हा वृक्ष हटविण्याची मागणी केली जात होती. झाडाची मुळे कमकुवत झाल्याने तो वृक्ष पूर्णपणे हटविण्याची मागणी करण्यात आली. कॅन्टोमेंटचे अभियंता सतीश मन्नोळकर यांनी वृक्ष परिसराची पाहणी केली होती. मागील दोन दिवसांपासून हा वृक्ष मुळापर्यंत हटविला. परिसरात रहिवासी वसाहत व शाळा असल्याने रहिवाशातून समाधान व्यक्त होत आहे.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article