आज स्व. आनंद दिघे हयात असते तर गद्दारांना गोळ्या घालून मारले असते - बबन साळगावकर
सावंतवाडी | प्रतिनिधी
मी काल 27 सप्टेंबरला आनंद दिघे यांचा चित्रपट पाहिला. आज जर आनंद दिघे हयात असते तर त्यांनी शिवसेनेशी गद्दारी करणाऱ्यांना सर्वांसमोर गोळ्या घालून मारले असते असे माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी बोलताना स्पष्ट केले . आता विधानसभा निवडणुकीत मीही माझी तोफ उघडणार. मी माझी तोफ भरून ठेवली आहे. या मैदानात कुठलं सावज समोर येईल त्यानुसार माझी तोफ मी धडाडणार आहे. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात कोरोना महामारीच्या काळात या मतदारसंघातील जनतेला वाऱ्यावर सोडून कोण गायब झाले होते.. ज्याने या मतदारसंघातील जनतेशी गद्दारी केली. प्रत्येक वेळी स्वार्थासाठी पक्ष बदलले आणि आपल्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना देशोधडीला लावले.. त्या विरोधात माझी लढाई आता मैदानावरच. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत येणारच.. असे माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.. मी काल 27 सप्टेंबरला आनंद दिघे यांचा चित्रपट पाहिला. आज जर आनंद दिघे हयात असते तर त्यांनी शिवसेनेशी गद्दारी करणाऱ्यांना सर्वांसमोर गोळ्या घालून मारले असते असेही त्यांनी स्पष्ट केले.