For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘द राजासाब’चा ट्रेलर सादर

06:12 AM Jan 07, 2026 IST | Tarun Bharat Portal
‘द राजासाब’चा ट्रेलर सादर
Advertisement

प्रभासचा हॉरर मिस्ट्री ‘द राजासाब’ची चाहते आतुरतेने प्रतीक्षा करत आहेत. हा चित्रपट 9 जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. याचदरम्यान निर्मात्यांनी चाहत्यांची उत्सुकता वाढवत याचा ट्रेलर जारी केला आहे.

Advertisement

या ट्रेलरमध्ये प्रभासची भूमिका राजासाब स्वत:च्या आजीला त्रास देणाऱ्या भूताला धडा शिकविण्याचा निश्चय करताना, परंतु स्वत:ला एका मायामहालात अडकल्याचे पाहतो, जेथून बाहेर पडणे तितके सोपे नसते. याचदरम्यान अनेक घटना घडतात, ज्यांना तो एक एक करत सामोरा जातो. या चित्रपटात भूताची भूमिका संजय दत्तने साकारली आहे, तर बोमन इराणीही महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. ट्रेलरच्या अखेरीस प्रभासचा धोकादायक क्लाउन लुक समोर येतो, जो अत्यंत वेगळा आणि भीतीदायक आहे.

ट्रेलरची सुरुवात प्रभासच्या जबरदस्त एंट्रीने होते, ज्यानंतर जरीना वहाब दिसून येते. जरीना साकारत असलेली व्यक्तिरेखा सर्वकाही विसरून जाते, केवळ संजय दत्त साकारत असलेली भूमिका तिला आठवत असते. स्वत:च्या आजीला भूताच्या कचाट्यातून सोडविण्याचा प्रयत्न करणारी भूमिका प्रभास साकारत आहे.

Advertisement

कल्कि 2898 एडीनंतर प्रभास ‘द राजासाब’द्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत संजय दत्त, जरीना वहाब, रिद्धि कुमार, निधी अग्रवाल आणि मालविका मोहनन मुख्य भूमिकेत आहे. द राजा साब  चित्रपटाचे दिग्दर्शन मारुती यांनी केले आहे. तर टीजी विश्व प्रसाद आणि कृति प्रसाद यांनी निर्मिती केली आहे.

Advertisement
Tags :

.