‘द नेकेड गन’चा ट्रेलर सादर
द नेकेड गन एका प्रसिद्ध कॉमेडी फ्रेंचाइजीचा रिमेक असून तो 1 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. लियाम नीसन यात लेफ्टनंट फ्रँक ड्रेबिन ज्युनियरची भूमिका साकारत आहे, जो लेस्ली नील्सच्या आयकॉनिक व्यक्तिरेखेचा पुत्र आहे.
ट्रेलरमध्ये लियाम नीसनला फ्रँक ड्रेबिन ज्युनियरच्या स्वरुपात दाखविण्यात आले असून जो पित्याप्रमाणे पोलीस स्क्वाडचे नेतृत्व करत आहे. ट्रेलरमध्ये ओ.जे. सिम्पसनची जुनी व्यक्तिरेखा नॉर्डबर्गचाही उल्लेख आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अकीवा शॅफरने केले असून तो सॅटरडे नाइट लाइव्ह आणि पॉपस्टारसाठी ओळखला जातो.
लियामसोबत पामेला अँडरसन, पॉल वॉल्टर हॉसर, केविन डुरंड, डॅनी हस्टन, लिजा कोशी, कोडी रोड्स, सीसीएच पाउंडर आणि बुस्ठा राइम्स हे कलाकार यात दिसून येणार आहेत. लियाम नीसम हा 72 वर्षीय असून तो अॅक्शनपटांसाठी ओळखला जातो. द नेकेड गन हा त्याचा पहिला विनोदी धाटणीचा चित्रपट आहे.
पामेला अँडरसनचे पुनरागमन
प्रसिद्ध अभिनेत्री पामेला अँडरसन या चित्रपटाद्वारे हॉलिवूडमध्ये पुनरागमन करत आहे. पामेला ही कामात स्वत:ला बुडवून घेणारी कलाकार असल्याचे लियाम नीसनने म्हटले आहे. पामेला अँडरसन आणि लियाम यांची जोडी पाहण्यासाठी दोघांचे चाहते उत्सुक आहेत.