‘द मेहता बॉयज’चा ट्रेलर सादर
बोमन इराणी यांनी स्वत:च्या दमदार अभिनयाद्वारे प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. बोमन यांचा आगामी चित्रपट ‘द मेहता बॉयज’चा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. या चित्रपटाची कहाणी पिता आणि मुलाच्या नात्यामधील गुंतागुंत दाखविण्यासोबत ती समजविण्याचा प्रयत्न करणारी आहे. प्राइम व्हिडिओवर बोमन यांचा हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन बोमन यांनीच केले आहे. 7 फेब्रुवारीपासून हा चित्रपट ओटीटीवर पाहता येणार आहे. या चित्रपटात बोमन इराणी, अविनाश तिवारी, श्रेया चौधरी आणि पूजा सरुप हे कलाकार मुख्य भूमिकांमध्ये दिसून येणार आहेत. हा चित्रपट हिंदी, तमिळ, तेलगू, मल्याळी आणि कन्नड भाषेतही पाहता येईल. चित्रपट पिता अन् मुलाची कहाणी दर्शविणार आहे. या दोघांची विचारसरणी परस्परांपेक्षा अत्यंत वेगळी आहे. दोघांनाही 48 तास एकत्र राहणे भाग पडल्यावर या कहाणीला एक नाट्यामय वळण मिळते. याच्या माध्यमातून बापलेकाच्या नात्यातील सुक्ष्म कंगोरे दाखविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.