For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘रिंग्स ऑफ पॉवर’चा ट्रेलर सादर

06:20 AM Aug 06, 2024 IST | Tarun Bharat Portal
‘रिंग्स ऑफ पॉवर’चा ट्रेलर सादर
Advertisement

विध्वंस घडवून आणण्यासाठी येतोय सौरोन

Advertisement

प्राइम व्हिडिओची लोकप्रिय सीरिज ‘द लॉर्ड ऑफ द रिंग्स’च्या पहिल्या सीझनला प्रेक्षकांकडून भरपूर प्रेम लाभले. आता निर्माते सीझन 2 सह परतणार आहेत. द लॉर्ड ऑफ रिंग्स : द रिंग्स ऑफ पॉवर’ सीझन 2 चा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे.

अमेझॉन प्राइमची ही वेबसीरिज चालू महिन्यात ओटीटीवर झळकणार आहे. नव्या सीझनमध्ये खूप काही नवे असेल, जे पूर्वीपेक्षा भयावह असू शकते. या सीरिजचा ट्रेलर निर्माते जे.डी. पेन, अभिनेत्री जेनर फॅन यवेट निकोल ब्राउनच्या उपस्थितीत लाँच करण्यात आला.

Advertisement

अॅक्शनने भरपूर ‘रिंग्स ऑफ पॉवर’च्या दुसऱ्या सीझनमध्ये पुन्हा एकदा खलनायक सौरोनची दहशत दिसून येणार आहे. तो पृथ्वीवर अंधकार आणि वाईटाच्या युगाच्या वापसीची घोषणा करत असल्याचे ट्रेलरमध्ये दाखविण्यात आले आहे. विश्वासघात आणि छळाच्या शक्तींचा वापर करत सौरोनने ‘रिंग्स ऑफ पॉवर’ नावाची अंगठी निर्माण केल्याचे यात दिसून येणार आहे.

कमालीचे पार्श्वसंगीत आणि संवादासोबत हा शो पुढील महिन्यात अमेझॉन प्राइमवर झळकणार आहे. ट्रेलर पाहून चाहते उत्सुक झाले आहेत. सीझन 2 मध्ये बैरो-वाइट्सचे सैन्य, हिल-ट्रॉल डॅमरोड, एक सागरी किडा देखील दाखविण्यात आला आहे. हा दुसरा सीझन 29 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे.

Advertisement
Tags :

.