For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

‘पोचर’चा ट्रेलर प्रदर्शित

06:38 AM Feb 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
‘पोचर’चा ट्रेलर प्रदर्शित

हत्तींवरील अत्याचारांची कहाणी दर्शविणारा चित्रपट

Advertisement

पोचर या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. या चित्रपटाच्या निर्मितीत अभिनेत्री आलिया भट्टचे योगदान आहे. एमी पुरस्कार विजेते निर्माते रिची मेहता यांचा हा चित्रपट असून तो हस्तीदंतासाठी हत्तींवर अत्याचार करणाऱ्या मोठ्या टोळीवर बेतलेला आहे. पोचर या चित्रपटाची निर्मिती रिची मेहता आणि क्यूस एंटरटेन्मेंटकडून करण्यात आली आहे.

आलियाने चित्रपटाचा ट्रेलर प्राइम व्हिडिओ इंडियासोबत शेअर केला आहे. ‘भारतातील सर्वात मोठ्या क्राइम रॅकेटची सर्वात मोठी कहाणी, पोचर प्राइमवर एक नवी, ओरिजिनल क्राइम सीरिज 23 फेब्रुवारीपासून स्ट्रीम होणार’ असे आलियाने कॅप्शनमध्ये नमूद केले आहे.

Advertisement

सत्य घटनांवर आधारित ‘पोचर’मध्ये मुक्या प्राण्यांवर लोक कशाप्रकारे अत्याचार करतात हे दाखविण्यात  आले आहे. भारतात हस्तीदंताच्या तस्करीवर  याची कहाणी आधारित आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन रिची मेहता यांनी केले आहे. तर निमिषा सजयन, रोशन मॅथ्यू औ, दिव्येंदु भट्टाचार्य यासारखे कलाकार यात दिसून येणार आहेत. हिंदीसोबत तमिळ, तेलगू, मल्याळी आणि कन्नड भाषेत ही सीरिज प्रदर्शित होणार आहे. या सीरिजच्या काही दृश्यांमध्ये आलिया देखील दिसून येणार आहे.

Advertisement

Advertisement
Tags :
×

.