पहला प्यार दूसरी बार’चा ट्रेलर प्रदर्शित
प्रेम अन् मैत्रीची नवी कहाणी
चित्रपट ‘पहला प्यार दूसरी बार’चा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. या चित्रपटात सर्व नवोदित कलाकार असून ट्रेलरमधील स्वत:च्या अभिनयाद्वारे त्यांनी स्वत:ची छाप पाडली आहे. मजेशीर वन-लाइनर्स, रोमान्स, मैत्री, जुना क्रश आणि अचानक निर्माण झालेल्या गुंतागुंतीची ट्रेलरमध्ये झलक आहे.
जवळपास 3 मिनिटांच्या ट्रेलरमध्ये तीन कहाण्या दाखविण्यात आल्या आहेत. तिन्ही कहाण्या प्रथम मैत्रीने सुरु होतात, त्यानंतर प्रेम होते आणि अखेरीस गैरसमज निर्माण होतो. जवळपास तिन्ही कहाण्यांचा अंत पश्चातापावर होतो.
पहला प्यार दूसरी बारमध्ये जबरदस्त स्क्रीन प्रेझेन्ससोबत स्पर्श वालिया, अलीशा चोपडा, कुणाल वैद, साक्षी वैद्य, तुषार छिब्बर आणि सरगन कौर लुथरा स्वत:चे पदार्पण करणार आहेत. निर्मात्यांनी ट्रेलरद्वारे या आश्वासनक नव्या टीमची झलक सादर केले आहे. यात 6 नवे चेहरे आहेत.
‘पहला प्यार दूसरी बार’ हा चित्रपट लव फिल्म्सकडून सादर करण्यात आला आहे. याची निर्मिती लव रंजना आणि अंकुर गर्गकडून करण्यात आली आहे. तर याचे दिग्दर्शन अनुज सैनीने केले आहे. हा चित्रपट 23 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे.