महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

‘लाईफ हिल गई’चा ट्रेलर प्रदर्शित

06:08 AM Jul 29, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

9 ऑगस्टला प्रदर्शित होणार सीरिज

Advertisement

दिव्येंदु शर्मा आता ‘लाईफ हिल गई’ या नव्या सीरिजसह प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अलिकडेच प्रदर्शित झालेल्या ‘मिर्झापूर 3’मध्ये दिव्येंदुची व्यक्तिरेखा मुन्ना भैयाला लोकांनी खूप मिस केले आहे. आता दिव्येंदु नव्या शैलीत स्वत:च्या चाहत्यांच्या भेटीला येत आहे. दिव्येंदु यात विनोदी भूमिकेत आहे.

Advertisement

लाइफ हिल गई या सीरिजचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. मोठे उद्योजक असणारे आजोबा आणि हॉटेल गुड मॉर्निंग वुड्स विलाचे मालक म्हणून या सीरिजमध्ये कबीर बेदी दिसून येणार आहेत. त्यांच्याकडून स्वत:च्या संपत्तीच्या वाटपाची घोष्णा केली जाते. दिव्येंदु आणि कुशा कपिला यात त्यांच्या नातवंडांची भूमिका साकारत आहेत. जो हॉटेल गुड मॉर्निंग वुड्स विला पुन्हा नफ्यात आणणार त्याच्या नावावर संपत्ती करणार असल्याची घोषणा त्यांच्या आजोबाकडून करण्यात आलेली असते.

या सीरिजमध्ये दिव्येंदुच्या प्रेयसीची भूमिका मुक्ती मोहनने साकारली आहे. यात विनय पाठक आणि भाग्यश्री देखील दिसून येणार आहे. हॉटस्टार स्पेशल कॉमेडी सीरिज 9 ऑगस्टपासून पाहता येणार आहे.  कुशा यापूर्वी ‘थँक यू फॉर कमिंग’ या चित्रपटात दिसून आली होती. तर दिव्येंदु हा कुणाल खेमूकडून दिग्दर्शित ‘मडगाव एक्स्प्रेस’ चित्रपटात प्रतीक गांधी, अविनाश तिवारी आणि नोरा फतेहीसोबत दिसून आला होता.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article