‘किस किसको प्यार करूं 2’चा ट्रेलर सादर
कॉमेडियन कपिल शर्मा स्वत:चा नवा चित्रपट ‘किस किसको प्यार करूं 2’सह प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. हा चित्रपट कपिलचा मागील हिट चित्रपट ‘किस किस को प्यार करूं’चा सीक्वेल आहे. कपिलचा मागील चित्रपट प्रेक्षकांना पसंत पडला होता. त्या चित्रपटातील कपिलच्या अभिनयाचे कौतुक झाले होते. कपिल शर्मासोबत या चित्रपटात मनजोत सिंह दिसून येणार आहे. या चित्रपटाच्या कहाणीत कॉमेडीसोबत विवाहावरून गेंधळाचा भडिमार आहे.
कपिल यात तीन विवाह झालेल्या पुरुषाची भूमिका साकारत आहे. स्वत:च्या तिन्ही पत्नींना तो कशाप्रकारे सांभाळतो हे पाहणे मजेशीर असेल. तिन्ही पत्नींना परस्परांच्या नजरांपासून वाचवत स्वत:चे जीवन आरामात जगण्याचा प्रयत्न करणाऱ्या इसमाची ही कहाणी आहे. हा चित्रपट 12 डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. अनुकल्प गोस्वामी याचे दिग्दर्शन लाभलेल्या चित्रपटाला रतन जैन, गणेश जैन आणि अब्बास-मस्तान यांनी निर्मित केले आहे. त्रिधा चौधरीसह आणखी दोन अभिनेत्री दिसून येणार आहेत.