‘ग्यारह ग्यारह’चा ट्रेलर प्रदर्शित
करण जौहर-गुनीत मोंगाची सीरिज
ग्यारह ग्यारह वेबसीरिजचा प्रीमियर लवकरच झी5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर होणार आहे. या सीरिजचा ट्रेलर निर्मात्यांकडून जारी करण्यात आला आहे. या सीरिजची निर्मिती करण जौहर आणि ऑस्कर विजेत्या निर्मात्या गुनीत मोंगा यांनी मिळून केली आहे. या सीरिजमध्ये राघव जुयाल आणि धैर्य कारवा मुख्य भूमिकेत आहेत. तर कृतिका कामरा समवेत अन्य कलाकार देखील दिसून येणार आहेत. या सीरिजचे दिग्दर्शन उमेश बिष्ट यांनी केले आहे. ही सीरिज 9 ऑगस्टपासून झी5 वर पाहता येणार आहे. झी5ने स्वत:च्या अधिकृत एक्स हँडलवर ग्यारह ग्यारहचा ट्रेलर शेअर केला आहे. वेळेच्या चुकीमुळे रहस्यमय गुन्ह्यांचा खुलासा होऊ शकतो अशी कॅप्शन या ट्रेलरला देण्यात आली आहे. राघव या सीरिजच्या माध्यमातून करण जौहरसोबत दुसऱ्यांदा काम करत आहे. ग्यारह ग्यारह ही दोन वेगवेगळ्या कळातील पोलीस अधिकाऱ्यांची एक रंजक कहाणी आहे, जी एका रहस्यमय वॉकी-टॉकीशी जोडलेली आहे. भूतकाळ आणि वर्तमानावर याचा प्रभाव पडत असतो. 1990 च्या दशकातील वरिष्ठ गुप्तहेर शौर्य अंथवाल (धैर्य कारवा) आणि एक तरुण पोलीस अधिकारी युग आर्या (राघव जुयाल) स्वत:ला एका अशा संचार उपकरणाशी जोडले गेल्याचे आढळतात, जे रात्री केवळ एक मिनिटासाठी सक्रीय होत असते. या सीरिजमध्ये गौतमी कपूर, हर्ष छाया, पूर्णेंदू भट्टाचार्य, मुक्ती मोहन आणि गौरव शर्मा देखील दिसून येतील.