महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

‘एक्सपॅट्स’चा ट्रेलर सादर

06:27 AM Dec 30, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

प्राइम व्हिडिओने ‘एक्सपॅट्स’चा ट्रेलर जारी केला आहे. ही सीरिज वाय.के. ली यांच्या आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वाधिक विकली जाणारी कादंबरी द एक्सपेट्रिएट्सवर आधारित आहे. सीरिजचा प्रीमियर 26 जानेवारी रोजी दोन एपिसोड्ससेबत होणार आहे. यातील नवे एपिसोड्स 23 फेब्रुवारीपर्यंत लाँच होणार आहेत.

Advertisement

‘एक्सपॅट्स’ सीरिजमध्ये अकॅडमी पुरस्कार आणि एमी विजेती अभिनेत्री निकोल किडमॅन, सरयू ब्ल्यु, जी-यंग यू, ब्रायन टी मेड आणि जॅक हस्टन इत्यादी कलाकार दिसून येणार आहेत. 2014 च्या हाँगकाँगच्या जिवंत आणि अशांत टेपेस्ट्रीच्या विरोधात सेट, एक्सपॅट्स, तीन अमेरिकन महिला मार्गारेट (निकोल किडमॅन), हिलरी (सरयू ब्ल्यू) आणि मर्सी (जी-यंग यू) वर केंद्रीत आहे, त्यांचे जीवन अचानक आलेल्या कौटुंबिक समस्येनंतर परस्परांशी जोडले जाते. सीरिज विशेष अधिकारांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करते. पीडित आणि दोषी असण्यामधील रेषा धूसर होते तेव्हा काय घडते याचा शोध या महिला घेत असतात. ब्रायन टी यांनी मार्गारेटचा पती क्लार्कची भूमिका साकारली आहे. तर जॅक हस्टनने हिलरीचे पती डेव्हिडची भूमिका पार पाडली आहे.

Advertisement

लुलु वांग ‘एक्सपॅट्स’साठी निर्माते, दिग्दर्शक आणि लेखक म्हणून काम केले आहे. लुलु काही काळासाठी डेनियल मेलियासोबत सीरिजचे कार्यकारी निर्माते आहेत.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article