For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘दो दिवाने शहर में’चा ट्रेलर सादर

06:02 AM Feb 14, 2026 IST | Tarun Bharat Portal
‘दो दिवाने शहर में’चा ट्रेलर सादर
Advertisement

व्हॅलेंटाइन वीकमध्ये प्रेमाची धडक

Advertisement

संजय लीला भंसाळी अत्यंत लवकरच एक रोमँटिक लव्हस्टोरी ‘दो दीवाने शहर में’ घेऊन येणार आहेत. या चित्रपटात सिद्धांत चतुर्वेदी आणि मृणाल ठाकूर पहिल्यांदा एकत्र दिसून येतील. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. हा चित्रपट व्हॅलेंटाइन वीकवर 20 फेब्रुवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

या चित्रपटाचा ट्रेलर एक आधुनिक प्रेमकथा दाखविणारा असून तो परफेक्शनला मागे टाकत भावनिक सत्याचा शोध घेणारा आहे. गैरसमज, सामाजिक दबाव आणि भावनांच्या चढउतारावर रचण्यात आलेली ही कहाणी एक अनमॅच जोडप्यासोबत सुरू होते, ज्यात मृणाल अंतिम क्षणी विवाहाला कुठल्याही कारणाशिवाय नकार देत असल्याचे दिसून येते.

Advertisement

प्रत्येक प्रेम परिपूर्ण नसते, परंतु पुरेसे असते या आशयाचा संवाद ट्रेलरमध्ये आहे. चित्रपटाला पार्श्वसंगीत अनुराग सैकियाने दिले असून ते मनाला भिडणारे आहे. चित्रपटात सिद्धांत, मृणालसोबत इला अरुण, जॉय सेनगुप्ता, आयशा रजा, विराज गेहलानी, संदीपा धर, दीपराज राणा, मोना आंबेगावकर, अचिंत कौर, नवीन कौशिक आणि मास्टर इनेश कोटियन हे कलाकार दिसून येणार आहेत.

Advertisement
Tags :

.