For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

‘क्रू’चा ट्रेलर सादर

06:14 AM Mar 20, 2024 IST | Tarun Bharat Portal
‘क्रू’चा ट्रेलर सादर

दिग्गज अभिनेत्री एअर होस्टेसच्या भूमिकेत

Advertisement

करिना कपूर, तब्बू आणि क्रीति सेनॉन या तिन्ही सुंदर अभिनेत्री प्रेक्षकांना एकत्रितपणे मोठ्या पडद्यावर पाहता येणार आहेत. क्रू या चित्रपटाचा ट्रेलर निर्मात्यांनी प्रदर्शित केला असून यात हास्याचे फवारे आहेत आणि रहस्य देखील आहे. क्रू एक कॉमेडी धाटणीचा चित्रपट असून यात विनोदामागे अत्यंत मोठ्या लुटीचा कट आहे.

तब्बू, करिना आणि क्रीति या लुटीचा कट अंमलात आणू पाहत असल्याचे ट्रेलरमध्ये दाखविण्यात आले आहे. याचबरोबर चित्रपटात दिलजीत दोसांझ देखील महत्त्वाच्या भूमिकेत आहे. ट्रेलरमध्ये कपिल शर्माची झलक देखील दिसून येते. तो यात एका पतीची भूमिका साकारत आहे. राजेश कृष्णनन यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. तर बालाजी मोशन पिक्चर्स अंतर्गत एकता कपूर, रिया कपूर, अनिल कपूर यांनी मिळून याची निर्मिती केली आहे.

Advertisement

तब्बू, करिना आणि क्रीति यांनी या चित्रपटात एअर होस्टेसची भूमिका साकारली आहे. या तिन्ही एअरहोस्टेस ज्या एअरलाइन्समध्ये काम करतात, त्याची आर्थिक स्थिती चांगली नसल्याने अनेक महिन्यांचा पगार त्यांना मिळालेला नसतो. अशा स्थितीत या एअर होस्टेसना कंपनी दिवाळखोर झाल्याचे कळते. मग सोन्याच्या बिस्किटाबद्दल त्यांना माहिती मिळते. यानंतर त्यांच्या आयुष्याला कुठले वळण मिळते हे चित्रपट पाहिल्यावरच कळणार आहे. हा चित्रपट 29 मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे.

Advertisement

Advertisement
Tags :
×

.