महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

‘भक्षक’चा ट्रेलर प्रदर्शित

06:21 AM Feb 05, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

भूमी पेडणेकर पत्रकाराच्या भूमिकेत

Advertisement

‘क्या अब भी आप अपनी गिनती इंसानों में करते है?’ या अपने आपको भक्षक मान चुके हैं...? काही अशाप्रकारचे प्रश्न प्रेक्षकांना विचारताना दिसून येणार आहे भूमी पेडणेकर. तिचा नवा चित्रपट ‘भक्षक’चा जबरदस्त ट्रेलर प्रदर्शित झाला असून यात ती अशाप्रकारचे प्रश्न विचारत आहे, कारण या चित्रपटात ती पत्रकाराची भूमिका साकारत आहे. या चित्रपटात संजय मिश्रा, सई ताम्हणकर आणि आदित्य श्रीवास्तव हे मुख्य भूमिकेत आहे. हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. ‘भक्षक’च्या ट्रेलरमध्ये एका अशा पत्रकाराची कहाणी दाखविण्यात आली आहे, जिला बालिकागृहात मुलींचे लैंगिक शोषण होत असल्याचे समजते. हा चित्रपट सत्यघटनेवर आधारित आहे. एका राजकीय नेत्याच्या वरदहस्तामुळे अल्पवयीन मुलींवर बलात्कार होत असतो, पोलीस देखील या नेत्याच्या प्रकरणी हस्तक्षेप करणे टाळत असतात. या नेत्याचा म्हणजेच ‘भक्षका’चा भूमी अखेर कसा पर्दाफाश करणार हे 9 फेब्रुवारीला समजणार आहे. शाहरुख खानची कंपनी रेड चिलिज एंटरटेन्मेंटच्या बॅनर अंतर्गत निर्मित हा चित्रपट नेटफ्लिक्सवर स्ट्रीम होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन पुलकितने केले आहे. मागील वर्षी भूमीचे अनेक चित्रपट प्रदर्शित झाले होते. यात ‘भीड’, ‘अफवाह’, ‘थँक्यू फॉर कमिंग’, ‘द लेडी किलर’ सामील होता, तर चालू वर्षात ती ‘भक्षक’ तसेच एका रिमेक चित्रपटात दिसून येणार आहे.

Advertisement

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article