For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘बस्तर’चा ट्रेलर सादर

06:32 AM Mar 09, 2024 IST | Tarun Bharat Portal
‘बस्तर’चा ट्रेलर सादर
Advertisement

नक्षलींच्या विरोधात लढताना दिसणार अदा

Advertisement

अभिनेत्री अदा शर्माला ‘द केरळ स्टोरी’मुळे प्रचंड लोकप्रियता प्राप्त झाली होती. द केरळ स्टोरीच्या यशानंतर निर्माता विपुल अमृतलाल शाह, दिग्दर्शक सुदीप्तो सेन आणि अदा शर्मा स्वत:चा आगामी चित्रपट ‘बस्तर द नक्सल स्टोरी’ घेऊन येत आहेत. या चित्रपटात नक्षलवादाच्या विरोधातील युद्ध दिसून येणार आहे. निर्मात्यांनी आता या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित केला आहे.

या चित्रपटात अदा शर्मा ही आयपीएस नीरजा माधवन ही भूमिका साकारणार आहे. चित्रपटाचा ट्रेलर अंगावर शहारे आणणारा आहे. यात नक्षलवादविरोधी युद्ध दाखविण्यात आले आहे. ट्रेलरमध्ये सीआरपीएफ जवानांना हौतात्म्य प्राप्त झाल्याचे आणि याचा सूड उगविण्याची कहाणी दाखविण्यात आली आहे. चित्रपटात नक्षलवाद्यांची दाखविण्यात आलेली क्रूरता थरकाप उडविणारी आहे.

Advertisement

बस्तरमधील नक्षलवाद्यांची दहशत आणि त्यांच्या विरोधात आवाज उठविणाऱ्याला ठार केले जात असल्याचे ट्रेलरमध्ये दिसून येते. अदा शर्माचा यातील अभिनय ठसा उमटविणारा आहे. या चित्रपटात अदा शर्मासोबत इंदिरा तिवारी देखील विशेष भूमिकेत आहे. सनशाइन पिक्चर्सच्या बॅनर अंतर्गत निर्मित हा चित्रपट 15 मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे.

Advertisement
Tags :

.