For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

‘बडे मियां छोटे मियां’चा ट्रेलर सादर

06:12 AM Apr 01, 2024 IST | Tarun Bharat Portal
‘बडे मियां छोटे मियां’चा ट्रेलर सादर

अक्षय अन् टायगरची जोडी

Advertisement

बहुप्रतीक्षित चित्रपट ‘बडे मियां छोटे मियां’चा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. टीझरने यापूर्वीच प्रेक्षकांमध्ये क्रेझ निर्माण केली होती. अली अब्बास जफरच्या दिग्दर्शनात तयार बडे मियां छोटे मियां या चित्रपटाची कहाणी एकदम नवी असणार आहे. यापूर्वीच्या चित्रपटात अमिताभ आणि गोविंदा यांनी मुख्य भूमिका साकारली होती. तर नव्या चित्रपटात अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ हे आर्मी मॅनच्या भूमिकेत शत्रूंचा विनाश करताना दिसून येणार आहेत.

भारताला प्रलयापासून वाचविणाऱ्या आर्मी मॅनची भूमिका या दोघांनी साकारली आहे. दोघेही जीव जोखिमीत टाकून देशाला वाचविण्यासाठी लढत असल्याचे ट्रेलरमध्ये दिसून येते. या चित्रपटात प्रलय नावाचा खलनायक असून तो भारताचा विनाश करू शकेल अशा शस्त्रास्त्राची चोरी करतो. मग भारताला वाचविण्यासाठी दोन आर्मीमॅन मिशन राबवत असल्याचे ट्रेलरमध्ये दिसून येते.

Advertisement

चित्रपटाच्या ट्रेलरमध्sय सोनाक्षी सिन्हाची झलक देखील दिसून आली आहे. अक्षय कुमारसाब्sात मानुषी छिल्लरची जोडी पुन्हा एकदा मजेशीर वाटतेय. यापूर्वी दोघेही पृथ्वीराज चौहान या चित्रपटात एकत्र झळकले होते. टायगर श्रॉफसोबत अलाया एफ दिसून येत आहे. तर खलनायकाच्या भूमिकेत पृथ्वीराज सुकुमारन आहे.

Advertisement

Advertisement
Tags :
×

.