For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

‘ऑल इंडिया रँक’चा ट्रेलर सादर

06:14 AM Feb 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
‘ऑल इंडिया रँक’चा ट्रेलर सादर

23 फेब्रुवारीला होणार प्रदर्शित

Advertisement

बॉलिवूड अभिनेता विक्की कौशलचा चित्रपट ‘मसान’मधील एक डायलॉग अत्यंत लोकप्रिय ठरला होता. ‘ये दुख काहे खत्म नहीं होता बे..’ हा डायलॉग वरुण ग्रोवर यांनी लिहिला होता. आता वरुण ग्रोवरच्या दिग्दर्शनात तयार चित्रपट ‘ऑल इंडिया रँक’चा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. विक्कीने हा ट्रेलर शेअर करत स्वत:चा मित्र वरुणचे कौतुक केले आहे. विक्की कौशलने स्वत:च्या कारकीर्दीची सुरुवात ‘मसान’ या चित्रपटाद्वारेच केली होती.

आम्ही दोन्ही इंजिनियरची चित्रपटजगतातील सुरुवात जवळपास एकत्रितच सुरु झाली होती. आता वरुण ग्रोवरच्या ‘ऑल इंडिया रँक’चा ट्रेलर शेअर करताना मी अत्यंत आनंदी आहे. वरुणचे हे दिग्दर्शनातील पदार्पण असल्याने मी त्याला शुभेच्छा देतो असे विक्कीने म्हटले आहे.

Advertisement

ऑल इंडिया रँक या चित्रपटात मध्यमवर्गीय कुटुंबाची कहाणी दाखविण्यात आली आहे. मध्यमवर्गीय जोडप्याला एक 17 वर्षांचा मुलगा असतो, ज्याला आयआयटी क्रॅक करण्यासाठी मोठ्या शहरात पाठविले जाते. त्या 17 वर्षीय मुलावर आईवडिलांच्या अपेक्षांचा भार असतो. परंतु त्याच्या काही स्वत:च्या इच्छा देखील असतात.  याच जीवनप्रवासात तो प्रेमात पडतो असे ट्रेलरमध्ये दिसून येते.

Advertisement

वरुण  ग्रोवरनेच या चित्रपटाची कहाणी लिहिली आहे. चित्रपटात बोधिसत्व शर्माने मुख्य भूमिका साकारली आहे. तर शीबा चड्ढा, गीता अग्रवाल शर्मा, शशी भूषण, शमता सुदिक्षा यासारखे कलाकार यात दिसून येणार आहेत. हा चित्रपट 23 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे.

Advertisement
Tags :
×

.