For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

प्रियांकाच्या ‘द ब्लफ’चा ट्रेलर सादर

06:52 AM Jan 26, 2026 IST | Tarun Bharat Portal
प्रियांकाच्या ‘द ब्लफ’चा ट्रेलर सादर
Advertisement

अभिनेत्री प्रियांका चोप्राचा नवा चित्रपट ‘द ब्लफ’चा ट्रेलर प्रदर्शित झाला असून तो जबरदस्त आहे. या हॉलिवूड चित्रपटात देसी गर्ल मुख्य भूमिकेत असून स्वत:च्या अॅक्शनदृश्यांद्वारे तिने चाहत्यांची मने जिंकली आहेत. ‘ही कहाणी रक्ताळलेल्या वाळूसोबत संपणार आहे, द ब्लफ हा चित्रपट 25 फेब्रुवारी रोजी प्राइम व्हिडिओवर येतोय’ असे प्रियांकाने ट्रेलर शेअर करत म्हटले आहे.

Advertisement

प्रियांका चोप्रा यात महिला सागरी चाचे एर्सेल ‘ब्लडी मेरी’ बोडेनची भूमिका साकारत आहे. या चित्रपटाची कहाणी 19 व्या शतकाच्या अखेरीस पॅरेबियन बेटावर आधारित आहे. प्रियांकाची व्यक्तिरेखा स्वत:चा पती आणि मुलांसोबत शांत जीवन जगत असताना अचानक तिच्या आयुष्यात संकटांची त्सुनामी येते, जेव्हा तिचा जुना कॅप्टन (कार्ल अर्बन) सूड घेण्यासाठी परत येतो. त्यापूर्वी प्रियांकाने त्याला फसवत खजिना घेऊन पळ काढलेला असतो. या चित्रपटाच्या कहाणीत सूड, आईचे प्रेम आणि याचबरोबर परिवाराच्या रक्षणासाठी जीव पणाला लावण्याची तयारी दिसून येणार आहे. प्रियांकाचा हा चित्रपट 25 फेब्रुवारी रोजी प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित होणार आहे. चित्रपटात प्रियांका चोप्रा, कार्ल अर्बन, टेमुएरा मॉरिसन, इस्माइल क्रूज कोर्डोवा, सफिया ओकली-ग्रीन आणि वेदांत नायडू यासारखे कलाकार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन फ्रँक ई. फ्लावर्स यांनी केले आहे. तर रुसो ब्रदर्सनी याची निर्मिती केली आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.