For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘हॅप्पी पटेल’चा ट्रेलर जारी

06:30 AM Dec 26, 2025 IST | Tarun Bharat Portal
‘हॅप्पी पटेल’चा ट्रेलर जारी
Advertisement

आमिर खानच्या चित्रपटांची प्रतीक्षा प्रेक्षक आतुरतेने करत असतात. आमिर आता एक नवा चित्रपट घेऊन आला आहे. परंतु यावेळी तो नायक म्हणून नव्हे तर निर्माता म्हणून सादर होणार आहे. हॅप्पी पटेल नावाचा चित्रपट त्याने निर्माण केला आहे. या चित्रपटाचे अनोखे मार्केटिंग आणि प्रचारानंतर आता याचा ट्रेलर जारी करण्यात आला आहे. चित्रपटाचे पूर्ण नाव ’हॅप्पी पटेल : खतरनाक जासूस’ आहे. याच्या ट्रेलरमध्ये जबरदस्त ह्यूमर आणि अनेक मजेशीर हटके क्षण दिसून येतात. दिग्दर्शक आणि अभिनेता दोन्ही भूमिकेत वीर दास स्वत:ची वेगळी आणि फ्रेश कॉमेडी स्टाइल घेऊन आला आहे. हा चित्रपट 16 जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. चित्रपटात वीर दास एक परफेक्ट परंतु काहीसा इम्परफेक्ट हेराच्या भूमिकेत असून तो एका मिशनवर असतो. कहाणी पुढे सरकताच तो अडचणीत सापडतो आणि मग पूर्ण गेंधळ सुरू होतो. चित्रपटात मोना सिंह देखील वेगळ्या शैलीत दिसून येणार आहे. याचबरोबर मिथिला पालकर तसेच आमिर खानही दिसून येणार आहे.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :

.