म्हाईची घाई...शर्यतीचा धुरळा..! जिल्ह्यात गावोगावी जपली म्हाईची परंपरा
सुधाकर काशीद
पै पाहुण्यांची वर्दळ, झणझणीत जेवण आणि त्यानिमित्ताने ग्रामीण समाज जीवनातील जपले जाणारे स्नेहबंध अशी परंपरा असले ली म्हाईची घाई गावोगावी चालू झाली आहे .काळ बदलला असला तरीही माहिती परंपरा प्रत्येक गावाने आस्थेने जपली आहे. या सोहळ्याला धार्मिक अंग जरूर आहे .पण त्यानिमित्ताने नातीगोती जपण्याची जात पात न धर्म न बघता स्नेहभोजनाची सामाजिक परंपरा आज ही प्राधान्याने पाळली जात आहे .आणि कोल्हापूरकर आठवड्यातून एकदा तरी आपल्या घरात मांसाहार करत असले तरी माईची पंगत अनुभवण्यासाठी म्हाईचे आमंत्रण कोणीही टाळत नाही ही आजही परिस्थिती आहे.
कालच करवीर तालुक्यातील चिखली गावची म्हाई पार पडली इतकी प्रचंड गर्दी झाली की या गावाकडे जाणारे काही रस्ते वनवे करण्याची वेळ आली. गाड्यांची मोठी रांग लागली. पण म्हाई म्हटलं की हे होणारच गृहीत धरून तब्बल 25 ते 30 हजार लोकांनी म्हाईची मजा अनुभवली. मुरगुड या मोठ्या गावाची म्हाई सोळा वर्षाच्या खंडानंतर झाली .त्या म्हाईला होण्राया गर्दीचा अंदाज घेऊन पोलिसांना वाहतूक यंत्रणेसाठी खास अधिसूचना काढावी लागली.
कोल्हापूर जिह्यात म्हाईची परंपरा खूप जुनी आहे. प्रत्येक गावाचे एक ग्रामदैवत असते .शेतीची बहुतेक कामे आटोपल्यानंतर त्या ग्रामदैवताची जत्रा झाली की म्हाईचा एक खास दिवस असतो. आणि या म्हाईत मांसाहारावरच भर असतो. माहिती निमंत्रण पै पाहुण्यांना मित्र परिवाराला दिले जाते .हा आकडा ज्याच्या त्याच्या संबंधावर असतो .पण किमान एका कुटुंबात माहीच्या निमित्ताने शंभर ते 200 माणसांचा गोतावळा हमखास असतो. ज्या कुटुंबांचा गोतावळा मोठा तेथे हजार माणसांचा गोतावळा जमतो. आणि त्या सर्वांसाठी खास मांसाहारी जेवणाचा बेत असतो.
कोल्हापूरच्या लोकांना मांसाहार अजिबात नवीन नाही. किंवा मांसाहार करून खूप दिवस झालेत अशी ही परिस्थिती नसते. पण माहीतील मांसाहारी जेवणाची मजा काही औरच असते. त्यामुळे महिला ज्यांना ज्यांना आमंत्रण ते सारे जण येणार हे जवळजवळ निश्चित असते. नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने गावाबाहेर गेलेले म्हाईसाठी गावाकडे वाटेल ते धडपड करून येणार हे देखील ठरलेले असते. आणि एकमेकापासून दूर गेलेल्या बालपणीच्या अनेक मित्रांची माहीच्या निमित्ताने गावात पुनर्भेट होते. लग्न होऊन गेलेल्या गावातल्या मुलींची माहीच्या निमित्ताने माहेराला हमखास भेट असते .गावातल्या देवळाजवळ खेळणी झोपाळे पाळणे यांची रांगच लागते. आता तर मोठ्या गावात नव्या दुचाकी चार चाकी वाहनांचे डिस्प्ले केले जाते.
म्हाई ही स्राया गावाची असते . त्यात जात-पाच धर्माची भिंत कधीच नसते. जो तो आपल्याशी संबंधित त्या सर्वांना निमंत्रण देण्याची प्रथा असते . त्यामुळे पैपाहुण्यांना तर या निमित्ताने जपले जातेच. पण मित्र परिवाराला आवर्जून निमंत्रण दिले जाते .शाळा कॉलेजमधील जुन्या मित्रांची या निमित्ताने भेट होते. गावच्या सरपंचालाही अरे तुरे ने हाक मारण्राया त्यांच्या मित्रांची जुनी मैत्री या निमित्ताने दिसते. अनेक मुले मुली बदलत्या काळात मुंबई पुण्याला शिकायला नोकरीला आहेत .त्यांच्या उच्चशिक्षित मित्रांचीही आवर्जून उपस्थिती असते. कोल्हापुरी झणझणीत मांसाहाराचा आस्वाद ही त्यांच्यासाठी एक वेगळी पर्वणी असते .खूप दिवसांनी गावाच्या माळावर तमाशाचा फड रंगलेला असतो. पहाटेपर्यंत ढोलकीचा खणखणाट चालू असतो .माहीचा दुस्रया दिवशी कुस्ती ,बैलगाडी घोडा गाडी शर्यतीचा दिवस असतो . ख्रया अर्थाने धुरळाच धुरळा उडतो .आणि हा धुरळा जस जसा खाली बसेल तसा माहीचा सोहळाही आटोपता घेतला जातो.
तमाशा ठरलेलाच...!
करमणुकीसाठी अनेक आधुनिक साधने आली असली तरीही माहीच्या निमित्ताने प्रत्येक गावात तमाशा अजूनही ठरलेला आहे . ते मांडी घालून बसून तमाशाचा आनंद मित्र परिवारासोबत घेण्याचा आनंद आजही जपला जातो. त्यानिमित्ताने छोट्या छोट्या तमाशा कलावंतांना माघ फाल्गुन महिन्यात एक कमाईची संधी असते. आणि खास म्हाईसाठी तमाशाचा तात्पुरता फड उभा करणारी काही कलाकार मंडळी आहेत. आणि त्यांना म्हाईच्या निमित्ताने मिळणारी संधी हा एक मोठा आर्थिक आधार आहे.
नवी परंपरा...!
चिखली गाव दरवर्षी महापुराने वेढलेले असते . मदतीला अनेक जण धावतात .जीवाची परवा न करता मदतीचा हात देतात .2019 पासून चिखली गावाने त्यांना महापुरात मदत केलेल्या सर्वांना म्हाईसाठी खास आमंत्रण देण्याची परंपरा चालू केली आहे .