महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

मुख्यमंत्री बदलाचा विषय चेष्टेचा नव्हे!

11:30 AM Sep 12, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

हायकमांडशिवाय पानही हलणार नाही; मंत्री हेब्बाळकर

Advertisement

बेळगाव : मुख्यमंत्री पदासंदर्भात गल्ली-बोळात किंवा रस्त्यावर बोलण्याचा तो विषय नाही, असे महिला व बालकल्याण खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सांगितले. सध्या कर्नाटकात सुरू असलेल्या मुख्यमंत्री बदलाच्या चर्चेवर बोलताना त्यांनी हा विषय रस्त्यावर बोलण्याचा नव्हे, असे सांगितले आहे. आमचे नेते सिद्धरामय्या हे मुख्यमंत्रीपदावर आहेत. त्यांचे मुख्यमंत्रीपद मजबूत आहे. आमच्या पक्षात हायकमांड आहे. पक्षाची शिस्त आहे. आपणही पक्षाची एक शिपाई आहे. त्यामुळे अशा मुद्द्यांवर हायकमांड निर्णय घेत असते. आमच्या पक्षाचे 135 आमदार मिळून कोणता निर्णय घ्यायचा, हे ठरवतात. अशा शब्दांत त्यांनी विरोधकांना उत्तर दिले. 135 आमदारांचा निर्णय होईपर्यंत, हायकमांड ठरवेपर्यंत मुख्यमंत्री बदलाचा प्रश्नच उद्भवत नाही. असे विचार रस्त्यावर बोलणेही योग्य नाही, असे लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सांगितले. पुढील मुख्यमंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, अशी चर्चा समाजमाध्यमावर सुरू आहे. याकडे पत्रकारांनी त्यांचे लक्ष वेधले असता अशा चर्चांना काही महत्त्व नाही, असे लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सांगितले.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article