इजिप्तच्या प्रसिद्ध राजाचे सिंहासन
3 हजार वर्षांनंतरही जशास तसे
तुतनखामुन हा इजिप्तचा प्रसिद्ध फिरौन म्हणजेच राजांपैकी एक आहे. तूतनखामुनला किंग तूत या नावाने देखील ओळखले जाते, त्याने प्राचीन इजिप्तवर ख्रिस्तपूर्व 1332-1323 पर्यंत राज्य केले होते. त्याचे एक शाही सिंहासन असायचे, ज्यावर बसून तो प्रजेला आदेश देत होता. त्याचे हे सिंहासन प्राचीन इजिप्तच्या कलेचे मास्टर पीस आहे. याचा रंग तीन हजार वर्षांमध्येही फिका पडलेला नाही, याचे भव्य डिझाइन हैराण करणारे आहे.
प्राचीन इजिप्तमधील हे सर्वात महत्त्वपूर्ण आणि उत्तमप्रकारे संरक्षित गोष्टींपैकी एक मानले जात आहे. याचा रंग तीन हजार वर्षांमध्येही फिका पडलेला नाही. हे सिंहासन लाकडाद्वारे तयार करण्यात आलेले असून सोने आणि चांदीने मढविण्यात आले आहे. यावर मूल्यवान रत्न आणि रंगीत काचांद्वारे सजावट करण्यात आली आहे. हे सिंहासन आजही सोन्याप्रमाणे चमकते.
तूतनखामुनच्या या शाही सिंहासनाचे डिझाइन हैराण करणारे आहे. दोन सिंहांचे शीर या सिंहासनाच्या आसनावर कोरण्यात आले आहेत. याच्या हँडलवर पंखयुक्त उरेई आणि कोब्रा सापाचे डिझाइन आहे. इजिप्तच्या चित्रलिपीत सिंहासनाला मदर गॉड आयसिसच्या नावावर इस्ट म्हटले जाते, ज्याला सर्वसाधारणपणे त्याच्या विशिष्ट प्रतिकाच्या स्वरुपात स्वत:च्या शिरावर सिंहासन धारण करत चित्रित केले जात होते. सिंहासनाच्या मागे राणी अंकेसेनमुनची पती तूतनखामुनसोबत आकृती रेखाटण्यात आली आहे. तूतनखामूनच्या शाही सिंहासनाचा शोध 1922 मध्ये ब्रिटिश पुरातत्व तज्ञ हॉवर्ड कार्टर यांनी लावला होती. हे सिंहासन तूतनखामूनच्या मकबऱ्यात आढळून आले होते.