महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

भारत-नेपाळमध्ये उद्घाटनाचा थरार

06:54 AM Jan 09, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

पहिली विश्वचषक खो खो स्पर्धा : विश्वचषकासाठी वेळापत्रक जाहीर, 13 जानेवारीपासून प्रारंभ

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

पहिल्या ऐतिहासिक खो-खो विश्वचषकाचा थरार अनुभवण्यासाठी जग सज्ज झाले आहे. 13 ते 19 जानेवारी दरम्यान नवी दिल्ली येथील इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियममध्ये ही स्पर्धा होणार असून या प्रतिष्ठित स्पर्धेत पुरुष व महिलांचे 39 संघ चुरशीचा खेळ करत विजेतेपदावर दावा करणार आहेत. या स्पर्धेने खो-खो ला आंतरराष्ट्रीय खेळ म्हणून मान्यता मिळणार आहे. पुरुष गटाचा सलामीचा सामना भारत आणि नेपाळ यांच्यात होणार आहे तर महिलांचा सलामीचा सामना इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होईल.

13 जानेवारीला रंगणाऱ्या उद्घाटन सोहळ्यानंतर भारत आणि नेपाळ यांच्यातील सलामीचा सामना रात्री 8:30 वाजता होणार आहे. स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील स्टार स्पोर्ट्स वाहिन्यांवर या सामन्यांचे थेट प्रक्षेपण होईल, तर दूरदर्शन प्रादेशिक स्तरावर देशभरात कव्हरेज देणार आहे. डिस्ने हॉटस्टार डिजिटल प्लॅटफॉर्मवर थेट प्रवाहाची सुविधा उपलब्ध करुन देणार आहे.

इंग्लंड-ऑस्ट्रेलिया महिला गटात सलामीची लढत

महिला गटातील सलामीचा सामना 14 जानेवारी रोजी सकाळी इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणार आहे. भारतीय महिला संघाचा पहिला सामना 14 जानेवारी रोजी सायं 7 वा दक्षिण कोरियाविरुद्ध होईल.

गटातील साखळी फेरीचे सामने 16 जानेवारीपर्यंत खेळले जातील. तर बाद फेरीचे म्हणजे उपांत्यपूर्व फेरीचे सामने 17 जानेवारीपासून सुरू होईल आणि महिलांचा अंतिम सामना 19 जानेवारी रोजी संध्याकाळी 7 वाजता खेळवला जाईल तर पुरुषांचा अंतिम सामना रात्री 8:15 वाजता रंगेल. दरम्यान, प्रत्येक गटातील दोन अव्वल संघ उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र ठरतील. यानंतर उपांत्य आणि अंतिम फेरीचे सामने होतील.

खो-खोचा जागतिक प्रवास

ही ऐतिहासिक स्पर्धा खो-खो ला आंतरराष्ट्रीय ओळख मिळवून देणारी ठरणार असून भारताच्या सांस्कृतिक वारशाचा आणि साहसी खेळाला प्रेक्षकांसमोर सदर करेल. इंदिरा गांधी स्टेडियमवर होणाऱ्या या स्पर्धेत उत्कंठावर्धक सामन्यांची मेजवानी प्रेक्षकांसाठी सज्ज आहे.

 

पुरुष गट: संघ विभाजन आणि महत्त्वाचे सामने

पुरुष गटात 20 संघ चार गटांमध्ये विभागले गेले आहेत:

गट अ: भारत, नेपाळ, पेरू, ब्राझील, भूतान

गट ब: दक्षिण आफ्रिका, घाना, अर्जेंटिना, नेदरलँड्स, इराण

गट क: बांगलादेश, श्रीलंका, दक्षिण कोरिया, अमेरिका, पोलंड

गट ड: इंग्लंड, जर्मनी, मलेशिया, ऑस्ट्रेलिया, केनिया.

 

महिला गट: संघ विभाजन आणि महत्त्वाचे सामन

महिला गटात 19 संघ चार गटांमध्ये विभागले गेले आहेत:

गट अ: भारत, इराण, मलेशिया, दक्षिण कोरिया

गट ब: इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, केनिया, युगांडा, नेदरलँड्स

गट क: नेपाळ, भूतान, श्रीलंका, जर्मनी, बांगलादेश

गट ड: दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड, पोलंड, पेरू, इंडोनेशिया.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article