सिलिंडरच्या भरधाव टेम्पोचा थरार
मिरज :
शास्त्री चौक येथे गॅस सिलिंडर टाक्यांची वाहतूक करणाऱ्या टेम्पोवरील मद्यधुंद चालकाने शनिवारी सकाळी अक्षरश: थरार केला. चालकाचा वाहनावरील ताबा सुटून भर रस्त्यात पाच दुचाकींना उडविले. या अपघातात दुचाकींचे मोठे नुकसान झाले. तर तिघे जखमी झाले. नागरिकांनी टेम्पो चालकाला पकडून चोप देत पोलिसांच्या हवाली केले. या घटनेने शास्त्री चौकात खळबळ उडाली.
घटनास्थळावऊन मिळालेली माहिती अशी, एचपी कंपनीचे गॅस सिलेंडर पुरवठा करणारा टेंम्पो (एमएच-10-सीआर-2107) शनिवारी सकाळी एसटी स्टँडकडून शास्त्राr चौक मार्गे म्हैसाळकडे जात होता. टेम्पोमधील मद्यधुंद चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने चौकातून जाणाऱ्या दुचाकी आणि थांबलेल्या दुचाकी वाहनांच्या दिशेने टेंम्पो घुसला. यामध्ये वाहनांचा चक्काचूर झाला.
शास्त्री चौकातील दुचाकी गॅरेज जवळ वाहन दुऊस्ती करत असताना मेस्त्राr इकबाल मीरासाहेब मणेर यांना टेम्पोने धडक दिली. संबंधीत मिस्त्री वाहनांसह ट्रकखाली अडकला. नागरिकांनी त्याला बाहेर काडून ऊग्णालयात दाखल केले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर मिरज शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मद्यधुंद चालकाला नागरिकांनी पकडून चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले. मिरज शहर पोलिसांनी चालकाला ताब्यात घेतले.