For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दहशतवाद्यांच्या बंदुकीचा थरार, गँगस्टरचा रूबाब !

06:45 AM Oct 28, 2026 IST | Tarun Bharat Portal
दहशतवाद्यांच्या बंदुकीचा थरार  गँगस्टरचा रूबाब
Advertisement

हातात पुस्तकांऐवजी बंदुकीचे आकर्षण, कतफ&त्वाऐवजी दहशतीचा ऊबाब आणि आदर्शांऐवजी कुख्यात गुन्हेगारांचा प्रभाव! दहशतवादी संघटनांच्या विळख्यापासून बिश्नोई गँगच्या वाढत्या आकर्षणापर्यंतचा प्रवास तऊणाईसमोरील गंभीर धोक्याची जाणीव करून देणारा आहे. गुन्हेगारांना नायक मानण्याची मानसिकता ऊजत असेल, तर हा केवळ गुन्हेगारीचा प्रश्न राहत नाहीय तो समाजाच्या भविष्याचा इशारा ठरतो. तऊणांच्या मनावर दहशतवाद आणि गँगस्टर संस्कृतीची मोहिनी पडतेय का, हा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे!

Advertisement

माहीममध्ये जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने प्रेरित झालेल्या  संशयीताला राज्य एटीएसने अटक केली. अचानक जैश-ए-मोहम्मद दहशतवादी संघटनेशी निगडीत असल्याने सर्व तपास यंत्रणा सतर्क झाल्या होत्या. मात्र राज्य एटीएसच्या तपासातून हा संशयीत कोणाच्याही संपर्कात नव्हता किंवा कोणत्याही दहशतवादी कारवाईत सामील नव्हता. याऊलट तो सोशल मीडियावर जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटेनचा प्रमुख मसूद अझर याचा फॅन असल्याचे समोर आले. तसेच तो त्याला फॉलो करीत असल्याचे देखील समोर आले. याचा अर्थ ज्याने देशाच्या संसदेवर हल्ला केला, देशात दहशतवादी कारवाया केल्या अशा नराधम मसूद अझरचा हा फॅन आणि त्यातही तो त्याच्या विचारांनी प्रेरीत झाला याचा अर्थ हा देशद्रोह करण्यासारखेच आहे. ज्या देशाने, ज्या मातीने ज्यांना ओळख दिली, त्यांनी दहशतवाद्यांशी भलावण करणे म्हणजे हा देशद्रोहच आहे.  दहशतवादी कारवाया असोत की गँगस्टरच्या कारवाया असोत याला तरूण पिढी नाहक बळी जात आहे. मग ते जैश-ए-मोहम्मद सारख्या दहशतवादी संघटना असोत की लॉरेन्स बिश्नोईची चिंधीचोर गँग असो. यांची क्रेझ बघूनच सोशल मीडियावर तसेच या गँगसाठी अथवा दहशतवादी संघटनेकरीता काम करण्यासाठी तरूण पिढीच नाही तर अबाल-वृद्ध देखील तयार होत आहेत.

चिंधीचोर लॉरेन्स बिश्नोईने तर सोशल मीडियावऊन गँगची भरती करण्याचा धडाका सुऊ केला आहे. या गँगचे देशभरात जवळपास 2 हजारहून अधिक हस्तक आहेत. तर एकट्या राज्यात 200 हून अधिक हस्तक आहेत. तर या हस्तकांची वये बघता सर्व 22 ते 38 दरम्यान आहेत. मग ते सलमान खानवरील हल्ल्यादरम्यान अटक केलेले संशयीत असो की, बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील हल्लेखोर असो की आता टायगर श्रॉफवरील हल्ल्यादरम्यानचे मारेकरी असो सर्व तरूण आहेत. हे सर्व सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांच्या संपर्कात होते. तर दुसरीकडे राज्य एटीएसने माहीममधून ज्या संशयीताला अटक केली, त्याच्यावर अनेक दिवसांपासून नजर होती. मोहम्मद हसन अबू सरमद अख्तर याला अटक केल्यानंतर त्याच्या मोबाईलमध्ये मसूद अझहर याच्या भाषणांच्या ध्वनिमुद्रिका, प्रक्षोभक पोस्ट, कट्टरतावादी विचारांना प्रोत्साहन देणाऱ्या कथित पोस्ट आढळल्या. यामुळे ऑनलाइन कट्टरतावाद आणि परदेशातील संभाव्य संपर्कांचा शोध घेण्याचे आव्हान तपास यंत्रणांपुढे पुन्हा अधोरेखित झाले आहे. मात्र, आरोपीचा जैश-ए-मोहम्मदशी प्रत्यक्ष संबंध किंवा व्यापक दहशतवादी कटातील सहभाग अद्याप सिद्ध झालेला नाही.

Advertisement

माहीम परिसरात राहणाऱ्या अख्तरच्या ऑनलाइन हालचालींबाबत महाराष्ट्र एटीएसच्या काळाचौकी पथकाला माहिती मिळाली होती. त्यानंतर माहीम मेट्रो स्थानकाजवळील लक्ष्मी इमारत परिसरातून त्याला ताब्यात घेण्यात आले. आरोपी मूळचा बिहारमधील असून, मुंबईत तो रॅपिडो दुचाकी

टॅक्सीचालक म्हणून काम करण्यासोबतच अत्तर विक्रीचा व्यवसाय करीत होता. या प्रकरणातील महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अझहर याच्या कथित भाषणांच्या ध्वनिमुद्रिका आरोपीच्या मोबाईलमध्ये आढळल्याचा तपास यंत्रणांचा दावा. या ध्वनिमुद्रिकांमध्ये बाबरी मशीद आणि इतर विषयांचा उल्लेख होता. तर आरोपी टेलिग्रामवरील कट्टरपंथीयांच्या ग्रुपमध्ये सक्रिय होता आणि तेथे अशा ध्वनिमुद्रिकांचा प्रसार करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. ‘इब्न-ए- कासिम’ या नावाच्या टेलिग्राम वाहिनीशीही आरोपीचा संबंध होता. या वाहिनीचे स्वरूप, तिच्यामार्फत प्रसारित होणारा मजकूर, तिचे व्यवस्थापक आणि सहभागी सदस्य यांची माहिती तपास यंत्रणांनी तपासली. या माध्यमातून अन्य व्यक्तींशी संपर्क साधला जात होता का, तसेच मुंबई किंवा महाराष्ट्रातील आणखी कोणी अशा ऑनलाइन ग्रुपमध्ये सहभागी आहे का, याचाही शोध घेतला. मात्र यामध्ये काही एक निष्पन्न झाले नाही. यामुळे राज्य एटीएसने तत्काळ त्याचा ताबा माहीम पोलिसांकडे सुपुर्द केला. वेळीच राज्य एटीएसच्या लक्षात आल्याने, हा तरूण पूर्ण दहशतवादी आणि त्यांच्या कारवायांमध्ये सामील होण्यापासून वाचला. तसेच मुंबई अथवा देशात भविष्यात येणाऱ्या संकटाला टाळले. माहीममधील अटकेमुळे डिजिटल माध्यमांचा वापर करून कट्टरतावादी विचार पसरविण्याच्या संभाव्य प्रयत्नांवर पुन्हा लक्ष पेंद्रित झाले आहे. समाजमाध्यमे, संदेशवहन सेवा आणि ऑनलाइन ग्रुप यांचा वापर सामान्य संवादासाठी होत असला, तरी काही प्रकरणांत त्यांचा वापर प्रक्षोभक मजकूर प्रसारित करण्यासाठी किंवा संशयास्पद संपर्क प्रस्थापित करण्यासाठी केला जाऊ शकतो, हे स्पष्ट झाले.

हे केवळ दहशतवादी संघटनाच करीत नाही. तर तरूणाईचा कल कुठे आहे? याची कल्पना आलेल्या चिंधी चोर लॉरेन्स बिश्नोई संघटनेने देखील करण्यास सुऊवात केली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून तरूणाईचे ब्रेन वॉश करीत त्यांच्यात थरारनाट्या करण्याची क्रेझ निर्माण केली आहे. अशा प्रकारचे थरारनाट्या करण्यासाठी आणि दहशत आजमाविण्यासाठी तरूण पिढी देखील खुलेआम गुन्हेगारीच्या दलदलीमध्ये स्वत:ला झोकून देत आहे. सोशल मीडियावर चाकु, कोयते, तसेच पिस्तुल घेऊन फोटो टाकणे, आपण खूप मोठे डॉन आहोत अशी मनोमन भावना या तरूणाईमध्ये निर्माण होत आहे. तर या भावनेला गुन्हेगारीची फुंकर दहशतवादी संघटना म्हणा किंवा चिंधीचोर गँग बिश्नोई घालत आहेत.

यामुळे बळी गेला तर या तरूणांचा जाईल, मात्र दहशत आपली होईल. तोच धडाका बिश्नोई गँगने देखील बॉलिवूडवर धमकी आणि हल्लासत्र करीत सुऊ केले आहे. तर या कामामध्ये नाहक बळी जात आहे अशा थिल्लर थरारनाट्याची क्रेझ असलेल्या तरूणाईचा.

अमोल राऊत

Advertisement
Tags :

.