For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Panhala Truck Fire | पन्हाळा तालुक्यातील वाघबीळ घाटात बर्निंग ट्रकचा थरार

11:53 AM Feb 27, 2026 IST | NEETA POTDAR
panhala truck fire   पन्हाळा तालुक्यातील वाघबीळ घाटात बर्निंग ट्रकचा थरार
Advertisement

               पन्हाळ्यातील वाघबीळ घाटात शासकीय धान्याच्या ट्रकला आग

Advertisement

पन्हाळा - पन्हाळा तालुक्यातील वाघबीळ घाटात शासकीय धान्य घेऊन जाणाऱ्या मालवाहु ट्रकला शॉटसर्किटमुळे आग लागली. केवळ प्रंसगावधानामुळे ट्रकसह आगीपासुन बचाव करण्यात लोकांना यश आले आहे. ही घटना गुरुवारी सकाळी आठ वाजता घडली. कोल्हापुर महानगरपालिकेच्या अग्नीशमन दलाने ही आग आटोक्यात आणली. तर या घटनेमुळे वाहतुक कोंडी होऊ नये म्हणुन बोरपाडळे रस्ते वाहतुक पोलिसांच्या सहकार्याने वाहतुकीच्या कोंडीवर नियंत्रण राखण्यात वाहतुक पोलिसांना यश आले.

गुरुवारी सकाळी कोल्हापुर येथील शाहु मार्केट यार्डातुन शासकीय धान्य भरुन मालवाहु शाहूवाडीतील शासकीय गोदामकडे जात होता. कोल्हापुर -पन्हाळा रोडवरील वाघबीळ घाटातील चढतीच्या शेवटच्या वळणावर चालत्या ट्रकमधुन अचानक धुर पडु लागला. त्यावेळी चालकाने ट्रक थाबवला, दरम्यान या मार्गावरुन हमाल केर्लीतील गोदामाकडे निघाले होते. हमालांनी जीवाची पर्वा न करता गाडीतील 12 टन बाहेर काढुन रस्त्याकडेला ढिग मारला आगीमुळे अंदाचे 300 किलो धान्य जळाल्याचे अंदाज आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.