For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

तिसरा डोळा उघडला अन् चोरटे सापडले

04:05 PM Jun 11, 2025 IST | Radhika Patil
तिसरा डोळा उघडला अन् चोरटे सापडले
Advertisement

कवठेमहांकाळ :

Advertisement

चोऱ्या करायला मित्र मित्राला मदत करतात मात्र तरूण आणि तरुणी मोटारसायकलच्या चोऱ्या करू लागले आहेत आणि ही चोरीची घटना कवठेमहांकाळ पोलिसांनी लावलेल्या सीसीटीव्ही मुळे उघडकीस आली.

शहरातून मोटारसायकल चोरी करण्प्रया तरूण-तरूणीला जत शहरातून अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी चंद्रकांत दरी कोळेकर (वय ३६, रा. हिंगणगाव, ता. कवठेमहांकाळ) यांनी दि. २० फेब्रुवारी २०२५ रोजी कवठेमहांकाळ येथील नवीन एस.टी. स्टॅन्डजवळील श्री पान शॉप जवळ त्यांची काळ्या रंगाच्या होंडा युनिकॉर्न क्रमांक एम एच १० बी एन ७६९३ या दुचाकी लावली होती परंतु ही गाडी चोरीस गेली व गाडी चोरीस गेल्याची तक्रार दाखल केली होती.

Advertisement

काही दिवसापूर्वी पोलिस निरीक्षक जोतिराम पाटील यांच्या पुढाकाराने कवठेमहांकाळ शहरात सीसीटीव्ही लावले आहेत. मोटारसायकल चोरल्यानंतर सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीनुसार आरोपी जतच्या दिशेने गेला असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पोलिसांनी शोधमोहीम राबवली.

यावेळी गुप्त बातमीदाराच्या माहितीनुसार विद्यानगर, जत येथील भाड्याच्या घरासमोर संशयास्पद एक मोटारसायकल उभी असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली असता ती चोरीस गेलेली होंडा युनिकॉर्न दुचाकी असल्याची पुष्टी झाली. यासोबतच आणखी एक हिरो स्प्लेंडर एम एच १० झेड ६४५८ ही चोरीची दुचाकी देखील त्याठिकाणी आढळून आली.

त्यानंतर पोलिसांनी आपला तपासाचा मोर्चा संतोष उर्फ महेश शंकर शिंदे (वय २८, रा. गारपीर रोड, इंदिरा नगर, सांगली, सध्या रा. विद्यानगर, जत) व उषा राजेश गोसावी (वय ३५, रा. गारपीर रोड, इंदिरा नगर, सांगली, सध्या रा. विद्यानगर, जत) यांना ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता त्यांनी दोन मोटारसायकली चोरल्याचे कबूल केले. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.

मोटारसायकल चोरट्यांचा शोध घेण्यासाठी श्रीमंत करे, निवृत्ती करांडे, व्हनमराठे, गायकवाड, कासार यांनी प्रयत्न केले तर पोलीस अधीक्षक संदीप घुगे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनिल साळुंखे यांनी चोरीतील आरोपी करण्याचे आदेश पोलीस निरीक्षक जोतिराम पाटील यांना दिल्यानंतर त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

कवठेमहांकाळ पोलीस स्टेशनच्या हद्दीतील गुन्ह्यांची उकल होण्यासाठी शहरांमध्ये ठिकठिकाणी सीसीटीव्ही बसवण्यात आले आहेत. ज्यांने करून गुन्हे उघडकीस मदत व्हावी. मोटारसायकल चोरणारे हे दोन आरोपी सीसीटीव्हीत कैद झाल्याने व पोलिसांनी कौशल्याने तपास केल्याने हे चोरट्यांनी अटक करण्यात आली, असे मत पोलीस निरीक्षक जोतिराम पाटील यांनी व्यक्त केले.

Advertisement
Tags :

.