महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

करणी सेना अध्यक्ष गोगामेडी हत्या प्रकरणातील तिसऱ्या हल्लेखोरालाही अटक

06:45 AM Dec 11, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

हत्येमागील नेमके कारण शोधण्यात होणार मदत

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे अध्यक्ष सुखदेव सिंग गोगामेडी यांची 5 डिसेंबर रोजी जयपूरमध्ये त्यांच्या घरात घुसून गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या हत्येतील दोन्ही मुख्य आरोपी नितीन फौजी आणि रोहित यांच्यासह त्यांचा तिसरा सहकारी उधम यालाही अटक करण्यात आली आहे. आता याप्रकरणी महत्त्वाचे धागेदोरे आणि हत्येमागील नेमके कारण उलगडण्यास मदत होणार आहे.

गोगामेडी हत्या प्रकरणातील तिघांनी मनालीहून येत हरियाणाला जाणार असल्याचे हॉटेल कर्मचाऱ्यांना सांगितले होते. शनिवारी संध्याकाळी 7:40 वाजता ते हॉटेलमध्ये पोहोचले आणि बरोबर एक तासानंतर, दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने आणि राजस्थान पोलिसांच्या संयुक्त कारवाईत त्यांना हॉटेलमधून पकडले. चंदिगडमधील ज्या हॉटेलमध्ये हे शूटर लपले होते, त्या हॉटेलचा व्यवस्थापक रवी डोग्रा यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. एवढेच नाही तर हॉटेलचे सीसीटीव्ही डीव्हीआर आणि बुकिंग रजिस्टरही पोलिसांनी जप्त केले आहे.

 सुखदेव सिंग गोगामेडी हत्या प्रकरणात आणखी एक खळबळजनक खुलासा झाला आहे. नितीन आणि रोहितने गोगामेडीच्या हत्येपूर्वी 50-50 हजार ऊपये घेतल्याचे सांगितले. पकडण्यापूर्वी त्याचा प्लॅन चंदीगडहून गोव्याला पळून जाण्याचा होता. बनावट ओळखपत्राच्या मदतीने त्याने चंदीगडमधील हॉटेलमध्ये खोलीही घेतली होती, असे चौकशीदरम्यान स्पष्ट झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चंदीगड नंतर दोघेही गोव्याला जाणार होते आणि तिथून ते दक्षिण भारतात वेळ घालवणार होते. प्रत्यक्षात त्यांना सुमारे 20 दिवस येथे घालवावे लागणार असल्याचे सांगण्यात आले. या काळात पासपोर्ट आणि व्हिसाची व्यवस्था झाल्यानंतर विदेशात फरार होण्याच्या मानसिकतेत वावरत असतानाच त्यांच्यावर अटकेची कुऱ्हाड कोसळली आहे.

 

Advertisement
Tags :
##tarunbharatnews#social media
Next Article