महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

मच्छे येथे चोरट्याला रंगेहाथ पकडले

11:23 AM Mar 11, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

घरफोडी करताना सापडल्याने नागरिकांनी केली धुलाई

Advertisement

बेळगाव : बंद घराचा कडीकोयंडा तोडून चोरी करताना रंगेहाथ सापडलेल्या एका चोरट्याची संतप्त नागरिकांनी धुलाई केली. मच्छे येथे रविवारी सायंकाळी ही घटना घडली असून चोरट्याला बेळगाव ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. त्याचे सहकारी पळून गेले आहेत. मच्छे-वाघवडे रोडवर रविवारी सायंकाळी 4.30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. एका घरातील मंडळी कामानिमित्त बाहेर गेली होती. हीच संधी साधून कडीकोयंडा तोडून चोरट्याने घरात प्रवेश केला. घरातील किमती वस्तूंसाठी शोधाशोध सुरू असतानाच घरमालक परतले. दरवाजा बंद होता. मात्र, कडीकोयंडा तोडल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. घरात कोणी तरी आहे, हे लक्षात येताच घरमालक सावध झाले. घरमालकांनी आरडाओरड करताच दोघे जण तेथून पळून गेले. तर एकटा सापडला. संतप्त नागरिकांनी त्याची धुलाई केली. बेळगाव ग्रामीण पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. चोरी करताना रंगेहाथ सापडलेल्या चोरट्याला पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. रात्री उशिरापर्यंत त्याची चौकशी करण्यात येत होती. संपूर्ण टोळीच्या मुसक्या आवळून त्यांनी आणखी कोठे चोऱ्या केल्या आहेत का? याचा तपास करण्याऐवजी ‘तुम्ही त्याला मारहाण का केलीत?’ अशी उलट तपासणी पोलिसांनी सुरू केली. बेळगाव परिसरात वाढत्या चोऱ्या, घरफोड्यांमुळे नागरिक हैराण झाले आहेत. चोऱ्या करताना चोरटे सापडले तर त्यांची धुलाई केली जात आहे. ग्रामीण भागात या घटना वाढल्या आहेत. पोलीस यंत्रणेने जर व्यवस्थितपणे गुन्हेगारांचा बिमोड केला असता तर नागरिकांवर कायदा हातात घेण्याची वेळ आली नसती. पोलीस मात्र चोर सोडून संन्याशाला फाशी देण्याचा प्रकार करत आहेत.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article